For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होळीच्या धामधुमीत विमानभाडे ‘सुसाट’

06:44 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
होळीच्या धामधुमीत विमानभाडे ‘सुसाट’
Advertisement

दुप्पट-तिप्पट दरांमुळे प्रवासी हैराण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

होळीच्या धामधुमीतच विमान कंपन्यांची मनमानी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. देशातील विमान कंपन्या प्रत्येक सणा-समारंभाचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार आता होळीच्या सणादरम्यान निदर्शनास आला असून विमान कंपन्यांनी आपल्या भाड्यात दुप्पट ते तिप्पट भाडे आकारत प्रवाशांना धक्का दिला आहे. सर्वच विमान कंपन्यांनी तिकिटांच्या किमती प्रचंड वाढवल्या आहेत. विमान कंपन्यांच्या मनमानी भाड्यावर लक्ष ठेवण्यासाठी देशात डीजीसीए नावाची संस्था आहे. विमान कंपन्यांची वृत्ती पाहता डीजीसीएच्या मौनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, याचा थेट फटका प्रवाशांना बसत असून त्यांना महागडे तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Advertisement

गेल्या तीन-चार दिवसांपासून होळीचा सण पाहता देशातील विमान कंपन्या मनमानीपणे तिकीट दरात वाढ करत आहेत. सर्वसाधारणपणे जयपूर ते कोणत्याही शहराचे भाडे साधारणपणे 5 हजार ऊपये असताना सध्या हा दर 15 ते 20 हजार ऊपयांच्या वर पोहोचला आहे. आता पुढच्या एक-दोन दिवसात म्हणजेच प्रवाशांच्या परतीच्या प्रवासावेळीही भाड्यातील ही वाढ कायम राहील अशी अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.