निवडणुकीतील पराभवानंतर फ्लाविओ बोल्सोनारो अमेरिकेत
पासपोर्ट रद्द, पत्नी आणि मुलींबाबतही चर्चा : न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप
वृत्तसंस्था, ब्राझीलिया
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दक्षिणपंथी नेते फ्लाविओ बोल्सोनारो यांनी अमेरिका गाठले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, त्यांच्या एका निकटवर्तीयाने त्यांच्या अमेरिकेतील प्रवासाची माहिती दिली. पासपोर्ट जमा करण्याच्या न्यायालयीन आदेशाचे पालन न केल्यामुळे त्यांचे प्रवास दस्तऐवज रद्द करण्यात आल्याचे समजते. त्यांच्या पत्नी आणि दोन मुलीही त्यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात आला; मात्र या प्रवासातील सर्व तपशील स्वतंत्रपणे निश्चित झालेले नाहीत.
25 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लूला दा सिल्वा यांनी विजय मिळवला. अधिकृत निकालानुसार, लूला यांना 51.79 टक्के, तर फ्लाविओ बोल्सोनारो यांना 48.21 टक्के वैध मते मिळाली. या निकालामुळे लूला यांची चौथ्या कार्यकाळासाठी निवड झाली.पराभवानंतर फ्लाविओ यांनी निकालाला आव्हान देण्याचे संकेत दिले होते.
पासपोर्ट जमा करण्याचा न्यायालयाचा आदेश
फ्लाविओ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगसंदर्भातील चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 24 तासांच्या आत पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश दिला होता. त्यांनी निर्धारित वेळेत पासपोर्ट जमा केले नसल्याने संबंधित दस्तऐवज रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. फ्लाविओ यांनी त्यांच्यावरील गैरव्यवहाराचे आरोप फेटाळले आहेत.
ट्रम्प यांची भूमिका चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लाविओ यांच्या अमेरिकेतील आगमनाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते. या घडामोडींमुळे अमेरिका आणि ब्राझील यांच्यातील राजकीय संबंधांवरही परिणाम होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. मात्र, फ्लाविओ यांना राजकीय आश्र्रय मिळणार का, याबाबतची अंतिम स्थिती स्पष्ट झालेली नाही.
अर्जेंटिनामार्गे प्रवास केल्याची चर्चा
फ्लाविओ यांनी अर्जेंटिनामार्गे अमेरिका गाठल्याची चर्चा आहे. मात्र, अर्जेंटिना सरकारने त्यांच्या देशात प्रवेशाची नोंद नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी नेमका कोणता मार्ग वापरला आणि ते अमेरिकेत कधी पोहोचले, याबाबत सुऊवातीला अनिश्चितता होती.
वडील जैर बोल्सोनारो यांचाही जुना संदर्भ
फ्लाविओ यांचे वडील आणि ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी 2022 मध्ये लूला यांच्याकडून पराभव झाल्यानंतर अमेरिका गाठली होती. नंतर ब्राझीलमध्ये परतल्यानंतर त्यांच्यावर सत्तापालटाच्या कटासंदर्भात कारवाई झाली आणि त्यांना 27 वर्षांच्या तुऊंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या पार्श्वभूमीवर फ्लाविओ यांच्या अमेरिकेतील प्रवासाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
