For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime | सीबीआयने आवळल्या होत्या बेड्या, पण जामिनावर सुटताच सोलापुरात पुन्हा कोट्यवधींचा चूना; 'या' बिल्डरचा भयंकर कारनामा

02:47 PM Jun 07, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime   सीबीआयने आवळल्या होत्या बेड्या  पण जामिनावर सुटताच सोलापुरात पुन्हा कोट्यवधींचा चूना   या  बिल्डरचा भयंकर कारनामा
Advertisement

Advertisement

सोलापूर - विजयपूर रोडवरील अपार्टमेंटमध्ये एका वर्षात फ्लॅटचा ताबा देतो म्हणून कोट्यवधी रुपये घेऊनही अनेकांना घरे दिली गेली नाहीत. मागील तीन महिन्यांत अशा आठ जणांनी शहर पोलिसांत धाव घेतली आहे. आता दोन चार्टर्ड अकाउंटंटनी विजापूर नाका पोलिसांत अशाच फिर्यादी दिल्या आहेत. त्यांचीही तब्बल दीड कोटींची फसवणूक झाली आहे.

चार्टर्ड अकाउंटंट चेतन नंदकिशोर नोगजा (रा. सनश्री अपार्टमेंट, वामन नगर, जुळे सोलापूर) आणि चार्टर्ड अकाउंटंट सचिन अशोक कट्टे (रा. राघवेंद्र नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून मोनाली थेपडे, दीपक गुगले, शीतल देशमुखे, अमित थेपडे, शंकर लोंढे व सागर शहा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमित थेपडेविरुध्द यापूर्वीही सोलापूर पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत तर मनी लॉ ड्रींगच्या गुन्ह्यात सीबीआयने अमितचेपडेला अटक केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी अमित थेपडे यास या गुन्ह्यात जामीन मिळालेला असून सोलापुरातील अनेक गुन्ह्यात तो फरारी आहे. तर गुन्हा दाखल झालेला सागर शहा हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे.

Advertisement

नोगजा यांनी त्यांच्या व आईच्या नावाने मे. गॅलोर डेव्हलपर्सच्या विजयपूर रोडवरील गॅलेक्सी पनाशमध्ये २०२१ मध्ये ए-२ विंगमधील फ्लॅट नं. १३०५ हा फ्लॅट घेतला असून त्यासाठी त्यांनी ३९ लाख ४६ हजार रुपये दिले. तसेच नोगजा व त्यांची पत्नी यांच्या नावे बुक केलेला बी विंगमधील फ्लॅट नं. १४०४ करिता ६५ लाख ६७ हजार रुपये अशी रक्कम थेपडे व त्याच्या साथीदारांनी स्वीकारली. दोन्ही फ्लॅ टसाठी लागणारी डीएचएफएल कंपनीचे सीओसी बनावट बनवून देऊन थेपडे याने दोन्ही फ्लॅटचा आजतागायात ताबा न देता नोगजा यांची फसवणूक केली. तसेच चार्टर्ड अकाउंटंट सचिन अशोक कट्टे (रा. राघवेंद्र नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनीही पनाश अपार्टमेंटमधील बी-विंगमधील १२०३ क्रमांकाचा फ्लॅट घेण्यासाठी ५२ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद विजापूर नाका पोलिसांत दिली आहे.

हा फ्लॅट घेण्यासाठी कट्टे यांनी २०२२ मध्ये ६० लाख २२ हजार रुपयांपैकी ३८ लाख ९० हजार रुपये आयसीआयसीआय बँकेच्या होम लोनद्वारे दिले. तर उर्वरित १३ लाख २२ हजार रुपये हे आयडीबीआय बँकेच्या खात्यातून गॅलोर डेव्हलपर्स या कंपनीच्या खात्यावर पाठविले होते. तर उर्वरित ८ लाख १० हजार रुपये फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर देण्याचे करारपत्राद्वारे ठरले होते. त्यानंतर थेपडे व त्याच्या साथीदारांनी अद्यापपर्यंत कट्टे यांना फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केली म्हणून मोनाली थेपडे, दीपक गुगले, शीतल देशमुखे, अमित थेपडे, शंकर लोंढे व सागर शहा यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.