महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झगमगते होर्डिंग आता ‘बुरख्याआड’

10:47 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ताबडतोब वीज जोडणी तोडा, होर्डिंग्ज झाका : उच्च न्यायलयाचा बेकायदा होर्डिंगप्रकरणी आदेश

Advertisement

पणजी : मांडवी नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या 21  बेकायदेशीर होर्डिंग्जची वीज जोडणी तोडा आणि सर्व होर्डिंग्ज झाकून ठेवा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल शुक्रवारी दिला आहे. राजधानी पणजी शहराच्या जवळून वाहत असलेल्या नयनरम्य मांडवी नदीच्या सौंदर्याला अनेक कारणांनी गालबोट लागलेले असतानाच त्यातच बेकायदेशीर होर्डिंग्जही आणखी त्रासदायक ठरत आहेत. मांडवीच्या बेती बाजूने उभारण्यात आलेल्या गुटखा, तंबाखूचे प्रदर्शन करणाऱ्या मोठ्या होर्डिंग्जमुळे आणखी गालबोट लागल्यासारखे दिसते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कालच्या सुनावणीवेळी न्यायालयाने या बेकायदेशीर होर्डिंग्जची वीज कापून होर्डिंग्ज झाकून ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Advertisement

या प्रकरणी 4 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने पेन्ह दी फ्रान्का ग्रामपंचायतीला गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (जीसीझेडएमए)   कोणत्याही मान्यता नसतानाही होर्डिंग उभारण्यासाठी 21 जमीनमालक / एजन्सींना दिलेल्या परवानग्या सादर करण्याचे निर्देश दिले होते. मांडवी नदीच्या काठी आणि हाय टाइड लाईनच्या (एचटीएल) 100 मीटरच्या आत होर्डिंग्ज उभारणाऱ्या सर्व 21 संबंधितांना पंचायतीने ते पाडण्याचे आदेश दिले असले तरी, या जमिनदोस्त करण्याच्या आदेशाला खुद्द पंचायत संचालकांनी स्थगिती दिली आहे.  याची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालाच्या गोवा खंडपीठाने पंचायत संचालकांना एका महिन्यात संबंधित अर्ज निकालात काढण्याचा आदेश 4 डिसेंबर रोजी जारी दिला आहे. तसेच, या संदर्भात गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाला (जिसीझेडएमए ) पाहणी करून अहवाल सादर करण्याचा निर्देश जारी केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article