For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवती रॉकवरील ध्वजारोहणाचा समावेश केंद्र शासनाच्या कॉफी टेबल बुकमध्ये

11:17 AM Jan 15, 2026 IST | अनुजा कुडतरकर
निवती रॉकवरील ध्वजारोहणाचा समावेश केंद्र शासनाच्या कॉफी टेबल बुकमध्ये
Advertisement

कुडाळ / प्रतिनिधी

Advertisement

निर्मनुष्य बेटावर करण्यात आलेल्या ध्वजारोहणावर आधारित कॉफी टेबल बुकचे केंद्र शासनातर्फे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यात निवती पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निवती रॉक येथील ध्वजारोहणाचा समावेश करण्यात आला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथील निर्मनुष्य बेटावर २६ जानेवारी 2025 या प्रजासत्ताकदिनी निवती पोलीस स्टेशन व ग्रामस्थांकडून ध्वजारोहण करण्यात आले होते. निवतीपासून आत समुद्रात असलेल्या निवती दिपगृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावर निवती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी भिमसेन गायकवाड व कर्मचारी यांनी जाऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला होता. याची दखल केंद्र सरकारने घेतली अशी माहिती निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली. निवती बेटावर खास बोटीने जावे लागते . त्या दिवशी ओहटी होती . त्यामुळे खूप प्रतिकूल परिस्थितीत त्या खडक सदृश्य बेटावर चढताना बरीच कसरत करावी लागली होती. पोलीस कर्मचारी व गावकरी यांनी बेटावर जाऊन ध्वजारोहण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जानेवारी रोजी निर्मनुष्य बेटावर ध्वजारोहण करण्याची संकल्पा मांडली होती. त्याला अनुसरून निवती या निर्मनुष्य बेटावर जाऊन निवती पोलीसांनी ध्वजारोहण केले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.