फ्लॅबलीग आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
फुटबॉल स्पर्धेत 12 संघांचा सहभाग
बेळगाव : आयबीसीटी स्पोर्ट्स क्लब फ्लॅबलीग चषक 14 वर्षांखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सक्षम स्पोर्ट्स एरीना टर्फ फुटबॉल मैदानावरती या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. सागर खन्नुकर, जयदीप बिर्जे, विजय रेडेकर, ओमकार खांडेकर, शुभम यादव, विवेक सनदी, जॉर्ज रॉड्रिग्ज, अखिलेश अष्टेकर, शोहेब चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 12 संघांनी भाग घेतला असून साखळीपद्धीचे सामने खेळविले जाणार असून त्यानंतर बाद पद्धतीचे सामने होणार आहे. विजेत्या व उपविजेत्या तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी चषक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्याशिवाय उत्कृष्ट गोलरक्षक, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट फॉवर्ड, उत्कृष्ट डिफेंडर, उत्कृष्ट मिडफिल्डर अशी वैयक्तिक बक्षीसे देण्यात येणार आहेत.