For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉयलरच्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू

06:22 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बॉयलरच्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू
Advertisement

आंध्रप्रदेशातील औषधनिर्माण कारखान्यातील दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुपती

आंध्रप्रदेशातील तिरुपती येथील श्री सिटीमधील एका औषधनिर्माण कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे कारण अज्ञात असून पोलीस तपास करत आहेत. स्फोट इतका शक्तिशाली होता की इमारतीचा काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

औषधनिर्माण कारखान्यातील बॉयलरचा स्फोटानंतर पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथके घटनास्थळी दाखल झाली. सत्यवेडू मंडळात अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथके घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मदत व बचावकार्य सुरू केले. स्थानिक प्रशासनाने जखमींना चांगल्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. स्फोटाच्या कारणाचा सध्या तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात तिरुपती जिह्यातील सत्यवेडू मंडळातील श्री सिटी येथील एका खासगी औषध कंपनीत घडला. बॉयलरमध्ये अचानक झालेल्या स्फोटात परिसरात काम करणारे कामगार सापडले. प्राथमिक माहितीनुसार, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दहा जण गंभीर जखमी झाले.

उपमुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तिरुपती जिह्यातील श्री सिटी येथे झालेल्या बॉयलर स्फोटाबद्दल दु:ख व्यक्त केले. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत घटनेबाबत विचारपूस केली. औषध उद्योगातील बॉयलर स्फोटात कर्तव्यावर असलेले चार कामगार जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. इतर जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला चांगल्या उपचारांसाठी चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.