महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्यप्रदेशात छत कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

06:07 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ महू

Advertisement

मध्यप्रदेशात महूमध्ये छत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत शुक्रवारी पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृतदेह काढण्यासाठी 3 जेसीबी, 1 पोकलेन तैनात करावे लागले. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि एका कंत्राटदाराचाही समावेश आहे. येथे गुऊवारीच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये स्लॅब टाकण्यात आला. हा स्लॅब दुसऱ्याच दिवशी कोसळल्याने जीवितहानी झाली. छत लोखंडी अँगलवर बांधले जात होते. लोखंडी अँगल छताच्या सिमेंट काँक्रीटचे वजन सहन करू न शकल्यामुळे ही दुर्घटना घडली.

Advertisement

इंदूरजवळ चोरल येथे बांधकाम सुरू असलेल्या फार्म हाऊसच्या छताखाली सहा मजूर दबले गेले होते. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. इंदूरमधील एक वकील चोरलमध्ये हे फार्म हाऊस बांधत होता. फार्म हाऊस बांधण्यासाठी सर्व मजूर इंदूरहून तेथे आले होते. काल दिवसभर काम केल्यानंतर कामगार रात्रीचे जेवण करून बांधकामाखालील छताखाली झोपले. छत कोसळल्याने सर्व कामगार गाडले गेले. या घटनेची रात्री कोणालाही कल्पना आली नाही. सकाळी गावातील काही लोक तेथून जात असताना त्यांना अपघात झाल्याचे समजले. यानंतर ऊग्णवाहिका बोलावून ढिगारा हटवण्याचे काम सुरू झाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article