महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

देवगड समुद्रात पाच विद्यार्थी बुडाले

05:11 PM Dec 09, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

चार मुलींचा समावेश

Advertisement

देवगड : प्रतिनिधी
देवगड येथील समुद्र किनारी पोहण्यास उतरलेले पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे पाच विद्यार्थी बुडाले. त्यात चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. ते समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता. पाचजण बुडू लागले. त्यावेळी आकाश तुपे त्यांना वाचविण्यास गेला. मात्र तोपर्यंत ते पाचजण खोल पाण्यात गेले. चार मुलींचे मृतदेह सापडले असून एक बेपत्ता आहे. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
# devgad # death # tarun bharat news# konkan # Five students drowned in Devgad sea
Next Article