For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार-लॉरी अपघातात पाच जण गंभीर जखमी

12:39 PM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
कार लॉरी अपघातात पाच जण गंभीर जखमी
Advertisement

हल्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंचीन-मदनळ्ळी येथील घटना

Advertisement

कारवार : खानापूर तालगुप्पा राज्य हमरस्त्यावर कार आणि लॉरी दरम्यान झालेल्या अपघातात कारमधील पाच प्रवासी गंभीररीत्या जखमी झाल्याची दुर्घटना शुक्रवारी हल्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंचीन-मदनळ्ळी येथे घडली. या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, हल्याळहून अळणावरकडे निघालेल्या कारने अळणावरहून हल्याळकडे निघालेल्या लॉरीला समोरुन जोराची धडक दिली. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लॉरीला जोराची धडक दिली, असे सांगितले जात असले तरी अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.  कारने लॉरीला एवढ्या जोरात धडक दिली आहे की, कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

कारमधील जखमी झालेल्या पाच प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात रक्मस्त्राव झाल्याचे सांगण्यात आले. अपघातास्थळी दाखल झालेल्या स्थानिकांनी आणि इमर्जन्सी सेवा कर्मचाऱ्यांनी जखमींना कारबाहेर काढले आणि उपचारासाठी हल्याळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. या भीषण अपघातामुळे खानापूर-तालगुप्पा राज्य हमरस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातस्थळाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी 112 पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन पाहणी केली आणि वाहतूक सुरळीत केली. जखमींची नावे समजू शकली नाहीत. हल्याळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.