आरसीबीचे पाच सामने चिन्नास्वामीवर होणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयपीएलचे विद्यमान विजेते आरसीबी येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पुनरागमन करणार असून या मोसमात घरच्या मैदानावर यावेळी त्यांना पाच सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.
आरसीबीच्या म्हणण्यानुसर, चाहत्यांसाठी सामने पुन्हा घरच्या मैदानावर आणण्याचे एक सामान्य ध्येय असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या अनेक महिन्यांचे कठोर परिश्रम व समन्वयानंतर हा महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आला. या मोसमातील आरसीबीचे उर्वरित दोन सामने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविले जातील. ‘बेंगळूरमध्ये सामने आयोजित करण्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य व पाठिंबा दिल्याबद्दल आरसीबी कर्नाटक सरकार, केएससीए व कर्नाटक पोलिसांचे आभार मानते. या हंगामासाठी पायाभूत सुविधा व सुरक्षा उपाययोजना वेळेवर वाढविण्याच्या सामूहिक प्रयत्नांमुळे विद्यमान विजेत्यांना त्यांचे घरचे सामने आपल्याच मैदानावर खेळावयास मिळतील, याची खात्री झाली आहे,’ असे त्यांनी निवदेनात म्हटले आहे.