For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दरोडा प्रकरणी एसएस गँगच्या प्रमुखासह पाच जण जेरबंद

01:23 PM Dec 08, 2024 IST | Radhika Patil
दरोडा प्रकरणी एसएस गँगच्या प्रमुखासह पाच जण जेरबंद
Five people including SS gang chief arrested in robbery case
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शहरातील राजेंद्रनगरात फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला अडवून, त्याला बेदम मारहाण करीत, त्याच्याकडील 3 लाख 61 हजार 377 ऊपयांची रोकडीसह 10 हजार ऊपये किंमतीचा मोबाईल हॅण्डसेट आणि 2 हजार ऊपयांचे बायोमॅटीक मशीन असा 3 लाख 73 हजार 377 ऊपये किंमतीच्या ऐवजावर दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापुरातील भारतनगर, साळोखे पार्कामधील एसएस गँगच्या प्रमुखासह त्याच्या पाच साथिदारांना अटक केली. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यानी दिली.

याप्रकरणी गँगचा प्रमुख सनी बाबासाहेब शिंदे (रा. भारतनगर, साळोखे पार्क, कोल्हापूर), त्याचा साथिदार किरण स्वामी वैदु (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), अभिजीत अनिल आवळे, विजय सुरेश कदम, रोहित सुरेश कदम (तिघे रा. जवाहरनगर झोपडपट्टी, जुना कंदलगाव नाका, कोल्हापूर) या पाच जणांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्याकडून या दरोड्यातील 2 लाख 50 हजार ऊपयांची रोकड, 1 लाख ऊपयांची मोपेड, 20 हजार ऊपयाचे दोन मोबाईल हॅण्डसेट असा 3 लाख 70 हजार ऊपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी, आकाश जगन्नाथ शिंदे (वय 26, रा. माले (ता. हातकणंगले) येथील आकाश जगन्नाथ शिंदे (वय 26) हा तऊण एका फायनान्स कंपनीमध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करीत आहे. तो बुधवारी (5 डिसेंबर ) रात्री फायनान्स कंपनीने महिला बचत गटाना दिलेल्या कर्जाच्या हप्ताची वसुली केलेली 3 लाख 61 हजार 377 ऊपयांची रोकड दुचाकीवऊन शहरातील राजाराम रायफल ते दिघे हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्यावऊन येत होता. यावेळी त्याच्या पाठीमागून एका मोपेडवऊन आलेल्या सुमारे चार जणांच्या टोळीने, त्याच्या दुचाकीच्या आडवी आपली मोपेड माऊन, त्याला थांबविले. त्याला शहरातील राजेंद्रनगरात आणून, त्याला बेदम मारहाण कऊन, त्याच्याकडील 3 लाख 61 हजार 377 ऊपयांची रोकडीसह 10 हजार ऊपये किंमतीचा मोबाईल हॅण्डसेट आणि 2 हजार ऊपयांचे बायोमॅटीक मशीन असा 3 लाख 73 हजार 377 ऊपये किंमतीच्या ऐवजावर दरोडा टाकून पोबारा केल्याची घटना घडली होती.

याबाबत राजारामपूरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याचा राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी समात्तर तपास सुऊ केला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना हा दरोडा शहरातील एसएस गॅगचा प्रमुख सनी शिंदे आणि त्याचे साथिदार किरण वैदु, अभिजीत आवळे, विजय कदम, रोहित कदम या पाच जणांनी टाकल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावऊन त्यासर्वांचा सुऊ कऊन, त्याच्या मुसक्या आवळण्यास पोलिसाना यश आले. तसेच त्याच्याकडून या दरोड्यातील 2 लाख 50 हजार ऊपयांची रोकड, 1 लाख ऊपयांची मोपेड, 20 हजार ऊपयाचे दोन मोबाईल हॅण्डसेट असा 3 लाख 70 हजार ऊपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे. त्याना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याना पोलीस कोठही सुनावली. पोलिसांनी या गँगकडे आजून कोठे दरोडा, घरफोडी, लुटमार यासारखे गुन्हे केले आहेत ? याचा तपास सुरु केला आहे.

दरोड्याचा कट गॅग प्रमुख शिंदेने रचला

फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकारी आकाश शिंदे याने महिला बचत गटाच्या कर्जाच्या हप्त्याची 3 लाखांची रक्कम एसएस गँग प्रमुख सनी शिंदे याची आई संगिता शिंदे याच्या घरातून घेवून जात होता. याची माहिती त्याला समजताच त्याने आपल्या साथिदाराच्या मदतीने वसुली अधिकारी शिंदेना मारहाण कऊन, त्याच्याकडील लाखो ऊपयांच्या पैश्यावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे पोलीस तपास समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.

Advertisement
Tags :

.