For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

MIraj Crime : खुनी हल्ल्याच्या कटातील पाचजण जेरबंद

02:54 PM Nov 14, 2025 IST | NEETA POTDAR
miraj crime   खुनी हल्ल्याच्या कटातील पाचजण जेरबंद
Advertisement

                           गांधी चौकी पोलिसांचे पोलिसिंग कौतुकास्पद

Advertisement

मिरज : निखिल कलगुटगी खून प्रकरणातील संशयीत सलीम पठाण व चैतन्य कलगुटगी या आरोपीना वैद्यकीय तपासणीसाठी आणल्यानंतर मिरज शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर खुनी हल्ला करण्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच जणांच्या टोळीला महात्मा गांधी चौकी पोलिसांनी जेरबंद केले.

या टोळीकडून एक पिस्तूल, तीन जीवंत काडतूस, एक कोयता आणि मोबाईलसह ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोळीबार आणि खूनी हल्ल्याचा कट उधळवून लावणाऱ्या गांधी चौकी पोलिसांचे जिल्हा पोलिस अधिक्षकांनी कौतुक केले.

Advertisement

अटक करण्यात आलेल्यांमध्ये वंश दिनकर वाली (वय २०, रा. दत्तनगर, पवनचक्कीजवळ, मिरज), समर्थ संजय गायकवाड (वय २१, रा. शंभर फुटी रस्ता, हडको कॉलनी, मिरज), आकाश जगन्नाथ कारंडे (वय २१, रा. म्हाडा कॉलनी, आंबेडकरनगर, मिरज), वैभव राजाराम आवळे (वय २८, रा. हडको कॉलनी) आणि रेकॉ र्डवरील सराईत गुन्हेगार सौरभ प्रसाद पोतदार (वय २३, रा. म्हाडा कॉ लनी) अशा पाच जणांचा समावेश आहे. गुरूवारी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

निखिल कलगुटगी खून प्रकरणातील संशयीत आरोपी सलीम पठाण आणि चैतन्य कलगुटगी या दोघांना बुधवारी दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणले होते. यावेळी बाह्य रुग्ण विभागात संशयीतांची तपासणी सुरू असताना, विभागाच्या दरवाजाजवळ गर्दीच्या ठिकाणी संशयीत वंश वाली हा एका हातात पिस्तूल घेऊन थांबल्याचे गांधी चौकी पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी चौकस बुध्दीने हालचाल ओळखून पकडले. व त्याच्याकडील पिस्तूल काढून घेतली. यावेळी वंश वालीसोबत असलेले अन्य संशयीत चौघेजण पळून गेले होते.

निखिल कलगुटगी खून प्रकरणानंतर वंश वाली, समर्थ गायकवाड, आकाश कारंडे, वैभव राजाराम आवळे आणि सौरभ पोतदार या टोळीने सलीम पठाण व चैतन्य कलगुटगी यांच्यावर खूनी हल्ला करण्याचा कट रचला होता, असे तपासातून समोर आले. पोलिसांनी सतर्कता दाखवत कट उधळून लावला. व कटात सहभागी पाच जणांना जेरबंद केले आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सौरभ पोतदार, वंश वालरसह सर्व संशयीत हे मयत निखिल कलगुटगी याच्या टोळीतील सदस्य आहेत. तर हल्लेखोरांचा कट उधळवून सतर्क पोलिसिंगचे दर्शन घडविणाऱ्या गांधी चौकी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे अधिक्षक संदीप घुगे यांनी कौतुक केले.

Advertisement
Tags :

.