देवदर्शनासाठी आलेल्या पाचजणांचा कावेरी नदीत बुडून मृत्यू
01:57 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
बेंगळूर :
कावेरी नदीत पाचजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी मंड्या जिल्ह्यात घडली आहे. चैत्रा (वय 20), श्वेता (वय 38), विजयम्मा (वय 50), प्रियांका (वय 28) आणि महेश अशी पाण्यात बुडालेल्यांची नावे आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. चन्नपट्टण येथील एकाच कुटुंबातील पाचजण बुधवारी सायंकाळी 4:45 च्या सुमारास मंड्या जिल्ह्यातील मुत्तत्ती (ता. मळवळ्ळी) येथे देवदर्शनासाठी आले होते. मुत्तत्तेराय देवाच्या दर्शन घेतल्यानंतर ते नदीपात्रात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
Advertisement
Advertisement