For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्युततार कोसळून पाच प्रवाशांचा मृत्यू; गाझीपूरमधील दुर्घटना

06:45 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्युततार कोसळून पाच प्रवाशांचा मृत्यू  गाझीपूरमधील दुर्घटना
Advertisement

प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग : 

Advertisement

वृत्तसंस्था/ गाझीपूर

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवासी बसला आग लागून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बसवर हायटेंशन विद्युततार कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. 11 हजार व्होल्टच्या हायटेंशन वायरला स्पर्श झाल्याने बसला आग लागली. बस विद्युततारेला चिकटताच काही मिनिटांमध्ये बस आगीच्या विळख्यात सापडली. बसमधील प्रवाशांनी आरडाओरड करत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आगीत लहान मुलेही बळी पडल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मंत्री अनिल राजभर यांनी प्रशासन या घटनेवर पूर्णपणे लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले. या भीषण अपघातात आगीनंतर भाजलेल्यांना ऊग्णालयात नेण्यात आले आहे. मर्दह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाहर धामजवळ उच्च दाबाच्या विद्युततारेचा स्पर्श झाल्याने प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लागली. अपघातग्रस्त बस काही वेळातच पेटू लागली. या दुर्घटनेचे व्हिडिओही व्हायरल झाले असून बस पूर्णपणे जळून खाक झालेली दिसत आहे.

बसला आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी पूर्ण ताकदीनिशी दाखल झाले. प्रशासनाच्या पथकाने बचाव कार्याची जबाबदारी घेतली. प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. या आगीत अनेक प्रवासी जखमी झाले असून गंभीररित्या भाजल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासह ऊग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.

Advertisement
Tags :

.