For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

या आठवड्यात 5 नवे आयपीओ होणार लिस्ट

06:03 AM Jul 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
या आठवड्यात 5 नवे आयपीओ होणार लिस्ट
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

20 जुलैपासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये पाच नवे आयपीओ खुले होणार आहेत. या शिवाय दोन आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची संधी असणार आहे. पाच कंपन्या बाजारामध्ये सुचिबद्ध होतील.

कोणते आयपीओ खुले होणार आहेत, हे पाहूया

Advertisement

गल्फ लॉईड-सदरच्या कंपनीचा आयपीओ 20 जुलैला गुंतवणुकीसाठी खुला होऊन 22 जुलैला बंद होणार आहे. 18.19 कोटी रुपये कंपनी आयपीओतून उभारणार आहे. कंपनीचा समभाग बीएसई एसएमईवर 27 जुलै रोजी सुचिबद्ध होऊ शकतो.

मेटालिक टेक्नोफोर्ज- सदरची कंपनी आयपीओतून 49.96 कोटी रुपये उभारणार आहे. 21 जुलै रोजी गुंतवणूकीसाठी आयपीओ खुला होणार आहे तर 23 जुलै रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी बंद होईल. 72 ते 77 रुपये प्रतिसमभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली आहे. सदरचा समभाग एनएसई एसएमईवर 28 जुलैला सुचिबद्ध होऊ शकतो.

क्युब हायवेज ट्रस्ट इनविट- 22 जुलैला हा आयपीओ खुला होऊन 24 ला बंद होईल. कंपनी या आयपीओतून 5 हजार कोटी रुपये उभारू इच्छिते. 151 ते 152 रुपये प्रतिसमभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली आहे. एनएसई व बीएसईवर समभाग 29 जुलैला सुचिबद्ध होऊ शकतो.

श्री बालाजी माला- 18.90 कोटी रुपये कंपनी आयपोच्या माध्यमातून उभारणार आहे. 22 जुलै रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 24 जुलैपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येईल. 66 मे 70 रुपये प्रतिसमभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली आहे. 29 जुलैला समाभाग बाजारात सुचिबद्ध होऊ शकतो.

एक्स्ट्रानेट टेक्नॉलॉजीस- 166.80 कोटी रुपये कंपनी आयपीओतून उभारणार असून 23 जुलैला खुला होणारा आयपीओ 27 तारखेला गुंतवणूकीसाठी बंद होईल. 120 ते 127 रुपये प्रतिसमभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली आहे. एनएसई व बीएसईवर 30 जुलैला समभाग सुचिबद्ध होऊ शकतो.

यांचे समभाग होणार सुचीबद्ध

याच आठवड्यात सोटेफीन भारत, कॅलीबर मायनिंग यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी बंद होणार आहेत. त्याचबरोबर या आठवड्यात 21 जुलैला मेन बोर्डवर एनएसई व बीएसईवर एसबीआय फंड्स मॅनेजमेंट आणि अल्पाईन टेक्सवर्ल्ड यांचे समभाग सुचिबद्ध होणार आहेत. याच दिवशी मिलवर्क टेक्नॉलॉजीस यांचेही समभाग सुचिबद्ध होतील.

Advertisement
Tags :

.