For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान

06:36 AM Nov 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान
Advertisement

कांकेरमधील जंगलभागात तीव्र संघर्ष : दोन जवान गंभीर

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडमधील कांकेर आणि नारायणपूरजवळील महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दलांनी शनिवारी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईनंतर सर्व मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ही चकमक सुरूच होती. दिवसभर चालू असलेल्या या संघर्षात सुरक्षा दलाचे दोन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारार्थ रायपूरमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे. एका जवानाच्या डोक्याला गोळी लागली असून दुसऱ्या जवानाच्या पायातून गोळी आर-पार गेल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

छत्तीसगडमधील कांकेर आणि नारायणपूर जिह्यांच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी पहाटेपासूनच विशेष मोहीम हाती घेत मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये बस्तरच्या जवळपास सर्व जिह्यातील डीआरजी जवान आणि महाराष्ट्रातील सी-60 कमांडो सहभागी झाले होते. नक्षल संघटनेचा केंद्रीय सदस्य असलेल्या अभयला घेरण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. तसेच खिलेश्वर गावडे आणि हिरामण यादव हे जवान गंभीर जखमी झाले आहेत.

कारवाईवेळी नक्षलवादी नेता अभय याच्यासह मोठ्या संख्येने नक्षलवादी उपस्थित होते. शनिवारी सकाळी दोन्ही राज्यांचे पोलीस दल अबुझमद जंगलात नक्षलवाद्यांच्या अ•dयांवर पोहोचले तेव्हा नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या कारवाईचा मागमूस लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार करत जंगलभागात आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर जंगलाच्या दिशेने फौजफाटा रवाना करण्यात आला. अतिरिक्त सुरक्षा जवानांना तैनात करून शोधमोहीम तीव्र करण्यात आली. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत या भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.