महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

06:11 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सी 60 जवानांच्या पथकाला यश

Advertisement

नागपूर/ प्रतिनिधी

Advertisement

गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेवर झालेल्या पोलीस आणि नक्षलवादी चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही कारवाई करण्यात सी 60 जवानांच्या पथकाला यश आले. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने मागील दोन दिवसापासून काही नक्षलवादी एकत्र येऊन कट रचनेच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

सदर जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुऊवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून माओवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला. सदर गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस पथकाकडून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला. या अभियानात 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले झाले. सदर जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे असून मफत माओवाद्यांची त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतची अधिक सविस्तर माहिती उद्या आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात येईल

नक्षलवादी गडचिरोली महाराष्ट्र व नारायणपूर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोपर्शी तालुका भामरागड जंगल परिसरात दबा धरून बसल्याची गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभियान  यतिश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम .रमेश यांच्या नेतफत्वात सी 60 पथकाच्या 22 तुकड्या व सीआरपीएफच्या क्युएटीच्या 2 तुकड्या या कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आल्या.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article