For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टिप्पर कलंडल्याने एकाच कुटुंबातील पाच जण ठार

06:34 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
टिप्पर कलंडल्याने एकाच कुटुंबातील पाच जण ठार
Advertisement

बागलकोट जिल्ह्याच्या बिळगी तालुक्यातील घटना

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

रस्त्याकडेला थांबलेल्यांवर माती भरलेला टिप्पर कलंडल्याने एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. ही घटना रविवारी सायंकाळी बागलकोट जिल्ह्याच्या बिळगी तालुक्यातील यत्नट्टी क्रॉसजवळ घडली. टायर फुटल्याने टिप्पर कलंडला. अपघातात यंकप्पा शिवप्पा तोळमट्टी (वय 72), यल्लव्वा यंकप्पा तोळमट्टी (वय 66), पुंडलिक यंकप्पा तोळमट्टी (वय 40), नागव्वा अशोक बम्मन्नावर, अशोक निंगप्पा बम्मन्नावर (वय 48) अशी मृतांची नावे आहेत.

Advertisement

शेतातील काम आटोपून घरी परतत असताना यंकप्पा, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई यांच्यावर काळाने झडप घातली. सकाळी शेतावर कामासाठी गेलेले सर्वजण आपल्या बादरदिन्नी या गावी परतण्यासाठी यत्नट्टी क्रॉसजवळ थांबले होते. यावेळी माती भरलेल्या टिप्परचा टायर फुटला. त्यामुळे तो रस्त्याकडेला थांबलेल्या पाच जणांच्या अंगावर कलंडला. यावेळी पाचही जण टिप्पर आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेनंतर टिप्पर चालकाने तेथून पलायन केले.

बागलकोट जिल्हा पोलीसप्रमुख प्रसन्न देसाई, बिळगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बिळगी तालुका इस्पितळात पाठविण्यात आले. बिळगी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

.