For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षिकेच्या खात्यातील पाच लाख गायब

06:58 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिक्षिकेच्या खात्यातील पाच लाख गायब
Advertisement

ऑनलाईन डॉक्टर सर्च करणे पडले महागात

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

आपल्या मुलावर डोळ्यांच्या उपचारासाठी गुगल सर्च करून मिळविलेल्या डॉक्टरांच्या नंबरवर संपर्क साधणे एका शिक्षिकेला महागात पडले आहे. सायबर गुन्हेगारांनी पाठविलेली लिंक ओपन केल्यानंतर या शिक्षिकेच्या बँक खात्यातील पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम सायबर गुन्हेगारांनी हडप केली आहे.

रायबाग तालुक्यातील एका शिक्षिकेची फसवणूक झाली आहे. यासंबंधी गुरुवारी जिल्हा सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. गुगल सर्चवरून मिळविलेल्या नंबरवर संपर्क साधणेही आता महागात पडू लागले आहे.

दि. 11 ते 13 जुलै दरम्यान ही घटना घडली आहे. एका शिक्षिकेने बेंगळूर येथील नारायण नेत्रालयाचा संपर्क क्रमांक मिळविण्यासाठी गुगल सर्च केले. त्यावेळी मिळविलेल्या एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता भामट्याने व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली. आम्हाला डॉक्टरांची अपॉईंटमेंट घ्यायची आहे, असे शिक्षिकेने सांगताच आपण पाठवलेली लिंक ओपन करून त्यावर नाव नोंदवा, असा सल्ला भामट्याने दिला.

भामट्याने पाठवलेली लिंक उघडताच त्यात काही नव्हते. त्यामुळे त्यांनी सोडून दिले. एक-दोन दिवसांनंतर आपल्या बँक खात्यातील 5 लाख 10 हजार रुपयांहून अधिक रक्कम भामट्याने पळविल्याचे या शिक्षिकेच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हा सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधून फिर्याद दिली आहे.

Advertisement
Tags :

.