महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लडाखमध्ये जेसीओसह पाच जवान हुतात्मा

06:31 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लष्करी रणगाड्यासह युद्धसराव करताना मध्यरात्री दुर्घटना

Advertisement

► वृत्तसंस्था/ लडाख

Advertisement

लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात लष्कराचे जवान रणगाड्यांसह सराव करत असताना शनिवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. दौलत बेग ओल्डी परिसरात लष्करी पथक रणगाड्यांसह सराव करत असताना नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. या अपघातात जेसीओसह लष्कराचे 5 जवान हुतात्मा झाले.

सरावादरम्यान रणगाडे नदीच्या पलीकडे नेले जात असताना अचानक नदीला पूर आला आणि जेसीओसह लष्कराचे 5 जवान वाहून गेले. या पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे पुरात सर्वजण वाहून गेले होते. या दुर्घटनेनंतर लष्कराकडूनच मदत व बचावकार्य राबविल्यानंतर त्यांचे मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्मा लष्करी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत त्यांची अनुकरणीय सेवा देश कधीही विसरणार नाही, असे सांगितले. “लडाखमध्ये नदी ओलांडताना झालेल्या दुर्दैवी अपघातात आपल्या पाच शूर भारतीय सैन्याच्या जवानांना प्राण गमवावे लागल्याने खूप दु:ख झाले. आमच्या शूर सैनिकांनी देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. शोकाकुल कुटुंबीयांना माझ्या मन:पूर्वक संवेदना. या दु:खाच्या वेळी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे.” असे ट्विट संरक्षणमंत्र्यांनी केले आहे.

सराव सत्रादरम्यान दुर्घटना

लडाखच्या न्योमा-चुशूल भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) शुक्रवारी मध्यरात्रीनंतर टी-72 रणगाड्यांमधून नदी ओलांडताना लष्कराचे पाच जवान वाहून गेल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून शनिवारी सकाळी सांगण्यात आले. लडाखपासून 148 किमी अंतरावर असलेल्या मंदिर मोरजवळ पहाटे 1 वाजता सराव सत्रादरम्यान ही घटना घडली.

मागील वर्षी अपघातात 9 जवान हुतात्मा   

लडाखमध्ये गेल्यावषीही लष्कराच्या वाहनाला एक भीषण रस्ते अपघात झाला होता. लष्कराचा ट्रक 60 फूट दरीत कोसळून 9 जवान हुतात्मा झाले होते. या लष्करी ताफ्यात पाच वाहनांचा समावेश होता. यामधून एकूण 34 जण प्रवास करत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article