पाच भारतीय अॅथलिट्स अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ नागोया
येथे सुरू असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात भारताच्या मुरली श्री शंकर, डेव्हीड सॉलोमन, संतोष तामिळरेसन, विथिया रामराज आणि अनु राघवन याने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात पुरुषांच्या लांब उडी या क्रीडा प्रकारात भारताच्या मुरली श्रीशंकर तसेच डेव्हीड सॉलोमन यानी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. तसेच 400 मी. अडथळा शर्यतीमध्ये भारताच्या संतोष तामिलरेसन, विथिया रामराज आणि अनु राघवन यानी अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. मात्र भारताच्या पालाक्षाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
पुरूषांच्या व्हालीबॉल प्रकारात भारताने विजयी सलामी दिली. रविवारी झालेल्या क गटातील सलामीच्या सामन्यात भारताने व्हीएतनामचा 25-23, 25-21, 25-20, अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना 85 मिनीटे चालला होता. आता भारताचा पुढील सामना हाँगकाँग बरोबर सोमवारी तर कत्तारबरोबर मंगळवारी होणार आहे.