फटाक्याचे गोडाऊन पेटल्याने पाच घरांना आग
आगीतमध्ये राहती घरं जळून खाक
कोल्हापूर

घिसाड गल्ली येथील फटाके गोडाऊनला गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये गोडावूनच्या शेजारी असणारी पाच ते सहा घरे जळून खाक झाली. प्रापंचिक साहित्य, कपडे, सोने, रोख रक्कम असे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान या आगीमध्ये झाले आहे.

या आगीत दस्तगीर खुतबुद्दीन मोमनी (वय ६४ ) यांचे प्रापंचिक साहित्यासह ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. गणेश काळे यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले असून यामध्ये ६ तोळे सोने, रोख रक्कम आणि प्रापंचिक साहित्याचा समावेश आहे.

सुरेश चौगुले यांचे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कपडे, धान्य आणि शिलाई मशीनचे नुकसान झाले आहे. रिक्षा चालक असणाऱ्या जमीर पन्हाळकर यांचे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, घर घेण्यासाठी आणलेले रोख ७ लाख रुपये जळून खाक झाले आहेत. तर अन्सार मुल्लाणी यांचे ८ तोळ्यांचे दागिने वितळले आहेत.