For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ढाक्याजवळ आगीत पाच जणांचा मृत्यू

06:22 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
ढाक्याजवळ आगीत पाच जणांचा मृत्यू
Advertisement

गॅस लायटरच्या कारखान्यात आग

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशची राजधानी ढाकाजवळच्या केराणीगंजमधील कदमतली परिसरात एका गॅस लायटर कारखान्याला भीषण आग लागली. रविवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सायंकाळपर्यंत बचाव पथकांनी ढिगाऱ्याखालून पाच मृतदेह बाहेर काढले होते. आगीचे कारण अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे. अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, आग लागताच घटनास्थळी घबराट पसरली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची सात पथके तैनात करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.