पाच दिवसांच्या सलग तेजीला लागला ब्रेक
सेन्सेक्स 931 अंकांनी घसरणीत, ऑटो-बँकिंग समभागांची विक्री, रुपया, कच्चे तेल वधारले
वृत्तसंस्था/मुंबई
बुधवारी युद्ध विरामाच्या बातमीनंतर दमदार तेजी अनुभवलेल्या भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी मात्र घसरण अनुभवली. सेन्सेक्स 931 तर निफ्टी 222 अंकांनी कमकुवत होत बंद झाला. मेटल आणि फार्मा क्षेत्रातील समभागांची खरेदी होताना दिसली तर ऑटो व बँकिंग समभाग मात्र कमकुवत झालेले पहायला मिळाले. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 931 अंकांनी घसरत 76631 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 222 अंकांनी घसरत 23775 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 882 अंकांनी कोसळत 54821 अंकांवर बंद झाला. समभागांमध्ये पाहता श्रीराम फायनान्स, टाटा मोटर्स पीव्ही आणि अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग सर्वाधिक वधारलेले तर कोल इंडिया, टेक महिंद्रा, नेस्ले यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले होते.
समभागांची कामगिरी
इतर समभागांमध्ये हिंडाल्को, एनटीपीसी, ओएनजीसी, टीसीएस, बजाज ऑटो, मॅक्स हेल्थकेअर, जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स, सनफार्मा, टाटा कंझ्युमर, डॉ. रे•ाrज लॅब्ज यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. घसरणीमध्ये पाहता मारुती सुझुकी, भारती एअरटेल, ग्रासीम, रिलायन्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, ट्रेंट, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन टूब्रो, इंडिगो, एचडीएफसी लाईफ, भारत फोर्ज, पतंजली फूडस्, आयडीबीआय बँक, एमआरपीएल यांचे समभाग होते.
...ही कारणे
लेबनॉनवरील हल्ल्यानंतर इराण आणि अमेरिकेतील युद्ध विराम दीर्घकाळ राहण्याची लक्षणे कमी झालेली दिसून आली. याचा परिणाम गुंतवणुकदारांवर नकारात्मक पाहायला मिळाला. याच दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ पहायला मिळाली. होर्मुझ बंदरातून अद्यापही जहाजांची वाहतूक सुरु झालेली नाही. काही गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर भर दिला होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- भारत इले. 439
- एनटीपीसी 378
- पॉवरग्रिड कॉर्प 298
- टीसीएस 2587
- एचसीएल टेक 1465
- टाटा स्टील 205
- टेक महिंद्रा 1454
- सन फार्मा 1717
- आयटीसी 303
- हिंडाल्को 985
- बजाज ऑटो 9510
- मॅक्स हेल्थकेअर 953
- डिव्हिस लॅब 5960
- कोल इंडिया 454
- हॅवेल्स इंडिया 1258
- सिप्ला 1223
- वरुण बेव्हरेजेस 423
- टीव्हीएस मोटर 3704
- लुपिन 2296
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इंटरग्लोब एव्ही. 4448
- लार्सन-टुब्रो 3897
- इटर्नल 237
- एचडीएफसी बँक 797
- आयसीआयसीआय 1280
- कोटक महिंद्रा 371
- स्टेट बँक 1040
- टेन्ट 3849
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1329
- अल्ट्राटेक सिमेंट 11410
- महिंद्रा-महिंद्रा 3167
- बजाज फायनान्स 903
- टायटन 4416
- इन्फोसिस 1331
- अॅक्सिस बँक 1318
- बजाज फिनसर्व्ह 1760
- एशियन पेन्ट्स 2269
- हिंदुस्थान युनि 2133
- अदानी पोर्ट 1447
- भारती एअरटेल 1858
- मारुती सुझुकी 13589
- जिओ फायनान्स 238
- अंबुजा सिमेंट 434
- श्रीराम फायनान्स 996
- ब्रिटानिया 5473
- कॅनरा बँक 137