For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हैसूरमध्ये ज्वेलर्समध्ये घुसून पाच कोटींचे दागिने लंपास

06:02 AM Dec 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
म्हैसूरमध्ये ज्वेलर्समध्ये घुसून पाच कोटींचे दागिने लंपास
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

म्हैसूर जिल्ह्याच्या हुनसूर तालुक्मयातील एका दागिन्यांच्या दुकानात घुसलेल्या दरोडेखोरांनी मॅनेजरवर गोळीबार करून सुमारे 4 ते 5 कोटी किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने लुटून फरार झाले आहेत. तोंड बांधून दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी हुनसूर बस स्थानकमागील स्काय गोल्ड अँड डायमंड शॉपमध्ये दिवसाढवळ्या दरोडा टाकला.

दरम्यान, चोरट्यांनी सोन्याच्या दुकानाचे मॅनेजर अजगर यांच्यावर गोळीबार केला. परंतु मॅनेजर सुरक्षितपणे बचावला आहे. पळून जाताना एका दरोडेखोराने त्याचे हेल्मेट दुकानात सोडून गेले आहे. या घटनेची माहिती मिळताच हुनसूर ग्रामीण आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक आणि फिंगरप्रिंट टीम तपास करत आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक एन. विष्णुवर्धन आणि एएसपी एल. नागेश घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्याने परिसरातील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.