महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वडूजमध्ये एकाच रात्रीत पाच घरफोडया 

01:40 PM Jan 05, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

वडूज : 

Advertisement

वडूज शहरातील पेडगाव रस्त्यावरील कर्मवीरनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी काल रात्री मोठा धुमाकूळ घातला. चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच घरांसह एक अंगणवाडी फोडली. या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी संगीता देवीदास कोळी यांच्या बंद घराचे दार उचकटून घरातील 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. तसेच अन्य चार बंद घरे फोडून चोरट्यांनी 20 हजार रुपयांच्या इलेक्ट्रीक साहित्यासह पाच हजार रुपयांची रोख रक्कमही चोरून नेली.

Advertisement

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडूज येथील पेडगाव रस्त्यावर कर्मवीरनगर येथे काल रात्री संगीता देवीदास कोळी यांच्या राहत्या घराचे दाराचे कुलूप तोडून कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून त्यामधील सुमारे आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, साडेपाच तोळे वजनाची मोहनमाळ, एक तोळे वजनाची कर्णफुले असे सुमारे 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच 15 हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केल्याचे कोळी यांनी सांगितले.
जवळच्या वसाहतीमधील श्रीमती मुमताज नूरमहंमद शेख या वृद्धेच्या घराचे कुलूप उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सुरू केला. त्यावेळी जवळच घरात राहत असलेला सूरज भापकर या युवकाला बाहेरून दारावर काही तरी मारत असल्याचा आवाज आल्याने त्याने खिडकी उघडली असता तीन ते चार जण अज्ञात चोरटे घराचे कुलूप उचकटत असल्याचे दिसले. त्यावेळी सूरजने आरडाओरडा करताच चोरट्यांनी भापकर यांच्या खिडकीवर दगड मारून तेथून पोबारा केला.

चोरट्यांनी जवळच्याच करमारे कॉलनीतील हुतात्मा परशुराम विद्यालयातील शिक्षक महादेव भोकरे यांच्या बंद घरात चोरी केली. त्यांच्या दाराचे कुलूप तोडून कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून त्यामधील साहित्याची उलथापालथ केली. येथून चोरट्यांनी पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. त्यांच्या समोरच राहत असलेल्या रोहिदास कदम (मूळ गाव गोडसेवाडी, ता. कोरेगाव, हल्ली रा. वडूज) यांच्या घराचे कुलूप व कडी कोयंडा उचकटून लोखंडी कपाटातील साहित्याची उलथापालथ केली. याशिवाय इलेक्ट्रीक व्यावसायिक किशोर बाबुराव पवार यांच्या बंद खोलीच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 20 हजार रुपये किमतीचे विजेचे साहित्य लांबविले. नजिकच असलेल्या एका अंगणवाडीच्या खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. घटनास्थळी वडूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहकाऱ्यांनी भेट दिली. अधिक तपासासाठी साताऱ्याहून ठसेतज्ञ व श्वान पथक आले होते.

चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य...
चोरी झालेल्या काही घरांपैकी कोळी व शेख या महिला कुटुंबातील अन्य सदस्यांकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. तर भोकरे व कदम हे कामानिमित्त परगावी होते. त्यामुळे त्यांची घरे बंद होती. चोरट्यांनी नेमका हाच डाव साधत बंद घरांना लक्ष्य केले. शिवाय सर्वच ठिकाणी चोरीची पद्धत एकच असल्याचे दिसून येते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article