For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचगणीत भिकारी, गर्दुल्ल्यांचा हैदोस

03:19 PM Feb 26, 2025 IST | Radhika Patil
पाचगणीत भिकारी  गर्दुल्ल्यांचा हैदोस
Advertisement

पाचगणी : 

Advertisement

पाचगणी शहरात भिकारी आणि गर्दुल्ल्यांनी हैदोस माजवला असून नगरपालिकेच्या समोरच असणाऱ्या मैदानात काही भिकारी व गर्दुल्ल्यांनी उघड्यावर आपले संसार थाटले आहेत. पालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे. आज येथील इमारतीचा दरवाजा या लोकांनी जाळून टाकला आहे. या लोकांवर तातडीने कारवाई करावी आणि त्यांना शहराबाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील नगरपालिकेच्या मराठी शाळेला लागूनच असणाऱ्या मोकळ्या जागेत गेली दोन वर्षापासून एक भिकारी जोडपे उघड्यावर आपला संसार थाटून राहात आहे. त्यांनी आता आणखी लोक त्याठिकाणी आणून स्थिरावले आहेत. रात्रीच्या वेळी दारू पिऊन या लोकांचा दंगा वाढला आहे. उघड्यावर चूल पेटवून त्यांचा उदरनिर्वाह चालला असला तरी यावठिकाणी त्यांनी केलेल्या घाणीमुळे या परिसराला दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेजवळ हा प्रकार असून पालिका या लोकांना का पाठीशी घालत आहे? हा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement

या लोकांनी एक एक करीत या ठिकाणी चार ते पाच लोकांना येथे स्थायिक केले आहे. दिवसभर दारू पिऊन या लोकांचा दंगा पाहायला मिळत आहे. दिवसभर ते या मैदानात झोपलेले दिसतात. आज तर या ठिकाणी असणाऱ्या इमारतीच्या दरवाजाला यातीलच एकाने आग लावली. यामध्ये दरवाजा पूर्णपणे जळून गेला आहे.

परिसरीतल अस्वच्छता, दुर्गंधी आणि घाणीमुळे पाचगणीच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत आहे तरी तातडीने या लोकांवर कारवाई करावी व त्यांना पाचगणीतून हाकलून द्यावे, अशी मागणी पाचगणीतील नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.