For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : चिखली फाटा येथे शस्त्रांच्या धमकीने दहशत निर्माण करणारे पाच जण अटकेत

01:13 PM Oct 30, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   चिखली फाटा येथे शस्त्रांच्या धमकीने दहशत निर्माण करणारे पाच जण अटकेत
Advertisement

    रत्नागिरी मार्गावर दहशत माजवणाऱ्या टोळक्याला करवीर पोलिसांचा खाक्या

Advertisement

कोल्हापूर : रत्नागिरी मार्गावर चिखली फाटा येथे एका टोळक्याने दोघांवर चाकू, कोयत्याने हल्ला करुन जखमी केले होते. तसेच रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून वाहनधारकांवर शस्त्रे उगारत दहशत निर्माण केली होती. या दहशतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या टोळक्याला अटक करुन करवीर पोलिसांनी घटनास्थळावरच त्यांची मस्ती उतरवली.

कस्तुरी आदित्य गवळी (वय २२ रा. अहिल्याबाई होळकरनगर, शिवकृपा तरुण मंडळाजवळ, फुलेवाडी, रिंगरोड) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टोळक्यांच्या हल्ल्यात कस्तुरी गवळी, संग्राम चौगुले, कदमवाडी हे जखमी झाले आहेत.

Advertisement

उत्कर्ष सचिन जाधव (वय २५ रा. कदमवाडी), अभिषेक विनय पिसाळ (बय २३ रा. राजारामपुरी), हर्षवर्धन शरद सुतार (वय २३ रा. रजपूतवाडी), अनुराग जयसिंग निमल (वय २३ रा. उजळाईवाडी), प्रथमेश भिमराव कांबळे (वय २१ रा. उत्रे, पन्हाळा) अशी संशयित हल्लेखोर आणि दहशत निर्माण केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी कस्तुरी गवळी आणि संशयित एकमेकांचे ओळखीचे आहेत. कस्तुरी गवळी या जखमी संग्राम चौगुले यांच्याबरोबर चिखली फाटा येथील हॉटेल ओंकारमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी उत्कर्ष जाधव आणि अभिषेक पिसाळ यांनी २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या शाब्दिक चकमकीच्या कारणांवरुन गवळी याने मला शिवीगाळ केली आहे.

त्याला मी मारुन टाकणार आहे. तू मध्ये येऊ नकोस म्हणत संग्राम चौगुले याला ढकलून उत्कर्षने कमरेचा चाकू आणि कोयता काढून गवळी यांच्या बार करुन जखमी केले. अभिषेक पिसाळ यानेही गवळी यांच्या डोक्यात बार करुन जखमी केले. यावेळी गवळी यांना वाचवण्यासाठी संग्राम चौगुले पुढे आले असता उत्कर्ष जाधवने चौगुले याच्यावरही हल्ला केला. यामुळे चौगुले हेही जखमी झाले आहेत. त्यांनी माजवलेल्या दहशतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या घटनेची दखल घेत करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे पोलीस पथके तयार करुन संशयितांचा शोध घेतला. त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली. यानंतर ज्याठिकाणी शस्त्रे नाचवली त्याच ठिकाणी घेऊन जावून त्यांना पोलिसी खाक्या दाखवला. यावेळी मात्र संशयितांनी माफी मागत पुन्हा असे कृत्य करणार नाही अशी विनवणी केली. हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, रणजित पाटील, राहुल देसाई, संजय काशीद, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, विजय पाटील यांनी ही कारवाई केली.

Advertisement
Tags :

.