फिटनेस सेंटरकडून व्यायामाला आधुनिक आयाम
कोल्हापूर / संग्राम काटकर :
शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम हा एक उत्तम पर्याय आहे. व्यायामाने शरीराची हालचाल होऊन अंगात ऊर्जा निर्माण होते. सतरा प्रकारच्या व्याधींपासून व्यायामामुळेच दुर राहता येते. गेल्या काही वर्षांपासून मात्र व्यायामाची परीभाषा बदलली आहे. नव्या पिढीचे आचार-विचारही बदलले आहेत. या बदलांमुळे धकाधकी, ताणतणावही तऊणाईत घोंघावत आहे. यापासून युवा पिढीला सशक्त राहण्यासाठी व्यायाम हा करावाच लागेल, अशी सद्यस्थिती आहे. दुसरीकडे आधुनिक आयाम घेऊन जिह्यातील शहरी भागात उभारलेली चकाचक फिटनेस सेंटर्स तऊणाईला व्यायामास येण्यासाठी खूणावत आहेत.
मुळात पश्चिम महाराष्ट्रात व्यायामशाळेची चळवळ सुरू होण्यामागे एक इंटरेस्टिंग बाब आहे. 1973 साली आजऱ्याहून कोल्हापूरात आलेले बिभीषण पाटील यांनी पहिली महाकाली तालीममध्ये व्यायामशाळा सुऊ कऊन कोल्हापूरात व्यायामशाळांचे बीज पेरले. महापालिकेनेही युवा पिढी सशक्त बनवण्यासाठी टप्प्या-टप्प्याने लोखंडी वजने असलेल्या 16 व्यायामशाळा शहरात सुऊ केल्या. तऊणाईसाठी हिंदी, इंग्लिश अभिनेत्यांसारखी पिळदार बॉडी कमण्यासाठी व्यायामशाळेत घाम गाळू लागली. आपल्या पोटाला सिक्स पॅक आणि छातीला व्ही शेपही आणत आहे. मांडीच्या मसल्स विकसित करत होते. अशा सगळ्या परिस्थिती व्यायामाची परीभाषा बदलून टाकणारी चकाचक, विद्यूत रोषणाईने उजळलेली व वातानुकूलित फिटनेस सेंटरही कोल्हापुरात उभारण्याला सुऊवात झाली होती. परंतू त्याकडे उच्चभ्रू तऊणाई व व्यक्तींशिवाय कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. परंतू सध्याच्या काळात फिटनेस सेंटरकडचा ओढा वाढला.
- अशी उभारली गेली आधुनिक मशिनरींची फिटनेस सेंटर
अगदी खोलात जाऊन पाहिले तर कोल्हापूरातील विविध क्षेत्रात गेल्या 20 वर्षांपासून अमुलाग्र बदल झाले. याला व्यायाम क्षेत्रही कसे अपवाद ठरणार. वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून देशातील मेट्रो सिटीमध्ये 30 वर्षांपूर्वी फिटनेस सेंटर सुरू झाली. लोखंडी वजनांऐवजी चांगला व्यायाम करवून घेणारी मशिनरी फिटनेसमध्ये उभारली गेली. त्याच्यासोबत मानसिक, शारीरिक व भावनिक स्वरूपाची तंदुरुस्ती फिटनेस सेंटरमधून निर्माण करता येते याचा प्रचार व प्रसार सुऊ झाला. हा प्रचार व प्रसार कोल्हापुरात येऊन थडकला. 2005 साली आधुनिक बाज घेऊन कोल्हापुरात तळवलकर जिम सुरू झाली. फिटनेस आयकॉन म्हणून ओळखले जाणारे मधुकर तलवलकर यांनी हे फिटनेस सेंटर सुरू केले. या सेंटरची मात्र केवळ उच्चभ्रुंनाच भुरळ पडली होती. परंतू गेल्या सात-आठ वर्षात फिटनेस सेंटरचा शहरात विस्तार वाढला आहे.
उच्चभ्रुंसह सर्वसामान्य कुंटुंबातील तऊण फिटनेस सेंटरकडे आकृष्ट होऊ लागले. या सेंटरमध्ये व्यायाम करण्यासाठी लागणारी ड्रेफरी कोल्हापुरातील खेळांच्या दुकांनामध्ये उपलब्ध झाली. पुऊष व महिलांसाठीची ड्रेफरी वेगवेगळ्या स्वऊपातील आहे. ही ड्रेफरी घालून महिला फिटनेसमध्ये दाखल होऊ लागल्या. आजमितीला महिला खेळाडू सोडल्या तर व्यायामापासून कोसो दुऊ राहिलेल्या शेकडो तऊणी व महिला विशिष्ट प्रकारची ड्रेफरी घालून सेंटरमधील मशिनरींच्या सहाय्याने व्यायाम करताना दिसत आहेत. ही फिटनेस सेंटरची जमेचीच बाजू म्हणावी लागले. कोल्हापुरातील फिटनेस सेंटरचा प्रसार जिह्यातील जयसिंगपूर, पेठवडगाव, वारणानगर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लजपर्यंत जाऊन थडकला.
आज मितिला शंभरहून अधिक फिटनेस सेंटर कोल्हापूरसह वरील गावांमध्ये उभारली आहेत. बऱ्याच फिटनेस सेंटरमध्ये झुंबा, एरोबिक्स, डान्स फिटनेस, योगा, ध्यानधारणा स्टेप वर्कआउट, टायर अँड रोप वर्कआउट यासारखे फंक्शनल फिटनेसची प्रात्यक्षिके प्रशिक्षक करवून घेताहेत. महिन्याकाठी तऊण-तऊणींकडून फिटनेस सेंटर फी म्हणून 1500 ते 4000 ऊपयांपर्यंतचे शुल्क घेतले जात आहे.
- आहार तज्ञांकडून मिळते मार्गदर्शन...
अलीकडच्या काळात सर्वच फिटनेस सेंटरमध्ये आहारतज्ञ पाहायला मिळताहेत. ते व्यायाम व शरीरयष्टीनुसार संबंधितांनी कोणता आहार घ्यावा हे सांगत असतात. शारीरिक तंदुरुस्ती प्रगतीपथावर जावी यासाठी प्रोटीन पावडर खाण्याचे मार्गदर्शनही ते करताहेत. वजन घटवण्याचे व वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा याचेही मार्गदर्शन फिटनेस सेंटरमधील ट्रेनर देताहेत. काही फिटनेस सेंटरमध्ये स्टीम बाथ व सोनाबाथचीही व्यवस्था आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तऊणाईला व्यसनांपासून दुर राहण्याचे संदेशही फिटनेस सेंटर देत आहेत.
-सारिका कदम, कदमवाडी
- फिटनेस सेंटरमधील मशिनरी व त्यांचा होणार उपयोग
ट्रेडमिल : वेगाने चालता येते, धावता येते. संपूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो. हृदयाशी निगडीत व्यायाम होतो.
क्रॉस ट्रेनर : जोरात चालता येते. हृदयाशी निगडीत सर्व हालचाली नियंत्रित ठेवून व्यायाम करता येतो.
स्पिनिंग सायकल : संगीताच्या तालावर सायकलिंग करणे. छोटा छोटा ब्रेक घेत 45 मिनिटे सायकलिंग केल्याने किमान 800 ते 900 कॅलरीज जळतात.
स्टेअर्स : पायऱ्या चढल्यासारखा हा वर्कआउट आहे. पायांचे स्नायू बळकट होतात.
लॅट पुल डाउन : पाठीचे पाठीचे स्नायू बळकट होतात.
लेग प्रेस : मांडीचे स्नायू बळकट होतात. मांडीचा आकारही विस्तारतो.
लेग एक्सटेन्शन : मांडीच्या खालील बाजूचे मसल्स बळकट होतात. गुडघ्याची ताकद वाढवतो. पायाची लवचिकताही वाढवतो. दुखापत कमी होते.
लेक कर्ल : मांड्याचे स्नायू बळकट करतात.
काप्स : पायाचे संतुलन सुधारते. घोट्याची स्थिरता व ताकत वाढवतो.
पेक फ्लाय : छातीचे स्नायू तंदुऊस्त होतात.
स्मित मशीन : छाती, पाय, खांदा, मांडीचा व्यायाम करता येतो. दुसऱ्याचा आधार न घेता या मशीनवर व्यायाम करता येतो.
रियल डेल्टोएट, लॅट्रल व शोल्डर प्रेस : खांद्याचे स्नायूंचा विकास करतो.
अडक्शन अबडक्शन व ग्लुट प्रेस : मांडी व सिटचे स्नायू विकसित करतात.
बेंच प्रेस : छाती स्नायू विकसित करतात
पॉवर केज : मांडीचा व्यायाम सुरक्षितपणे करता येतो
सिटेट रोइंग : पाठीच्या मधले स्नायू विकसित करता येतात
प्रिचर कर्ल : दंडाचा आतील व बाहेरील भाग विकसित करते.