For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मच्छिमार प्रवीण परब यांना विशाल परबांची आर्थिक मदत

04:06 PM Nov 15, 2023 IST | अनुजा कुडतरकर
मच्छिमार प्रवीण परब यांना विशाल परबांची आर्थिक मदत
Advertisement

मासेमारी साहित्याला आग लागल्याने झाले होते लाखोंचे नुकसान

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

नरकचतुर्दशीच्या पहाटेला शिरोडा -केरवाडी येथील मच्छीमार प्रवीण उर्फ गोटया परब यांच्या मच्छी व्यवसायाच्या ठेवलेल्या शेड मधील जाळया,होडी व इतर साहित्याला आकस्मित आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. या संदर्भात भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब,प्रथमेश तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी त्यांच्या सोबत शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर,शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे,शिरोडा ग्रामपंचायत विदयमान सदस्य सुधीर नार्वेकर,मयूरेश शिरोडकर भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,विदयमान आरवली सरपंच समीर कांबळी, शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्य तातोबा चोपडेकर,शिरोडा केरवाडी येथील मच्छीमार ग्रामस्थ प्रशांत बटा,सत्यविजय पेडणेकर,सदाशिव तारी,सुहास निकम,सावळाराम बटा,संदेश सावंत,देविदास कुबल,वासू तारी,प्रमोद मोठे,गोपाळ बटा,तृप्तेश चोडणकर,भाई घाटवळ, आणी इतर ग्रामस्थ उपस्थित होते

Advertisement

Advertisement
Tags :

.