For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजीत 9 पासून मासळी महोत्सव

02:45 PM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
पणजीत 9 पासून मासळी महोत्सव
Advertisement

विविध मासळीचे प्रदर्शन,खाद्यपदार्थांची रेलचेल : सांस्कृतिक-मनोरंजन कार्यक्रम, विविध स्पर्धा 

Advertisement

पणजी : राज्य सरकारच्या मच्छीमार संचालनालयाच्यावतीने 9 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत राजधानी पणजीतील कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर मासळी महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम आता वार्षिक झाला असून तो लोकप्रिय होत असल्याचे संचालनालयाचे म्हणणे आहे. या महोत्सवातून विविध प्रकारची मासळी आणि त्यांचे प्रदर्शन पाहाण्याची संधी गोमंतकीय जनतेला मिळणार आहे. मासळी व्यवसाय, त्याबाबतचे शिक्षण, रोजगार, स्वावलंबन संधी याची माहिती देणे हा प्रमुख हेतू त्यामागे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोव्यातील जनतेचे प्रमुख खाद्य मासळी असून राज्यात येणारे पर्यटक यांनाही त्याचा लाभ होणार आहे. मासळी व्यवसायातील तंत्रज्ञान आणि त्याची माहिती देऊन तरुणांना त्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून हा महोत्सव आखण्यात आला आहे. महोत्सवात मासळीचे विविध प्रकारचे अन्न - खाद्यपदार्थ, त्यांचे स्टॉल्स, विविध स्पर्धा, लोकनृत्ये यांचाही समावेश असून करमणुकीचे व मनोरंजनाचे कार्यक्रमही पाहण्याची संधी लाभणार आहे. गोवा राज्य मासळी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असून पर्यटकांनी तेथे भेट द्यावी, अशी मच्छीमार खात्याची अपेक्षा आहे. त्या महोत्सवाची तयारी लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.