सीईएस-2024 मध्ये पहिला पारदर्शक स्मार्ट टीव्ही सादर
एलजी कंपनीने सादर केला पहिला टीव्ही : अन्य उत्पादनांचाही समावेश
लास वेगास :
वर्षातील सर्वात मोठा टेक इव्हेंट, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीईएस) 2024 लास वेगास, अमेरिकेत सुरू झाला आहे. यामध्ये दक्षिण कोरियाची कंपनी एलजीने जगातील पहिला पारदर्शक टीव्ही सादर केला आहे.
याशिवाय एआय रोबोट आणि 2 इन 1 लॅपटॉप ही उत्पादनेही सादर करण्यात आली आहेत. वेबसाइटनुसार, 1.30 लाखांहून अधिक लोक सीईएसला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. 12 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील 4000 हून अधिक कंपन्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे प्रदर्शन करत आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या 35 टक्के कंपन्या अमेरिकन आहेत.
सीईएस-2024 मध्ये सादर केलेल्या उत्पादनांबद्दलची माहिती पाहुया.
जगातील पहिला पारदर्शक डिस्प्ले टीव्ही
दक्षिण कोरियाची कंपनी एलजीने जगातील पहिला पारदर्शक स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. यात 77-इंचाचा ग्लास डिस्प्ले आहे. त्यामुळे क्रीनवर दिसणारे फोटो बनावट होलोग्रामप्रमाणे हवेत तरंगताना दिसतात. थ्उ एग्gहूल्rा ध्थ्Dिं ऊन्न् या वर्षाच्या अखेरीस जागतिक स्तरावर उपलब्ध होईल.
हातमोजे घालून गेम खेळताना आरोग्याची माहिती मिळणार
पामप्लग कंपनीने नवे हातमोजे सादर केले आहेत. त्याच्या प्रत्येक बोटावर सेन्सर आणि एलईडी दिवे आहेत. व्हर्च्युअल रिअॅलिटीसह अनेक कारणांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, गेम खेळताना स्ट्रोकच्या रूग्णांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे त्यांना पुन्हा हालचाल करण्यास मदत होईल. यामध्ये रुग्ण गेम खेळत राहतो आणि डॉक्टरांना त्याच्या आरोग्याशी संबंधित डेटा मिळतो.
पाळीव प्राण्यांसाठी एआय रोबोट
रोबोटिक्स कंपनी ऑगमनने या शोमध्ये ओआरओ नावाचा रोबोट सादर केला आहे, जो तुमच्या पाळीव प्राण्यांची पूर्ण काळजी घेईल. तो त्यांच्याशी खेळेलच, पण गरज पडल्यास त्यांना खाऊ घालेल आणि औषधही देईल.
लेनोवोचा 2 इन 1 लॅपटॉप सादर
लेनोवोने 2 इन 1 लॅपटॉप थिंकबुक प्लस जेन5 हायब्रिड लॅपटॉप सादर केला आहे. यामध्ये युजर्सना विंडोजसोबतच अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमही मिळेल. जेव्हा तुम्ही ते लॅपटॉप मोडमध्ये वापरता तेव्हा ते लॅपटॉपप्रमाणे काम करेल.