कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आधी सूड उगवला, आता संघर्षविराम

06:58 AM May 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताच्या अटींवर शस्त्रसंधी, सिंधू पाणीवाटप करार स्थगितच राहणार, पाकिस्तानला अंतिम संधी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पहलगामच्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेले चार दिवस होत असलेला सशस्त्र अखेर पाकिस्तानने नांगी टाकल्याने थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने घातलेल्या अटींवर शस्त्रसंधी करण्यास पाकिस्तानला भाग पाडण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी प्रथम दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी सज्ज असल्याची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रथम पाकिस्तानने आणि नंतर भारताने शस्त्रसंधी लागू झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे निदान पुढचा काही काळ तरी संघर्ष थांबणार आहे. या शस्त्रसंधीचा प्रस्ताव दूरध्वनीवरून पाकिस्तानच्याच सैन्याधिकाऱ्यांनी भारताच्या सैन्याधिकाऱ्यांसमोर ठेवल्याचे प्राप्त झालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. तसेच आता सोमवार, 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ चर्चेसाठी सामोरे जाणार आहेत

22 एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध पुरुष पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन अत्यंत निर्दयपणे गोळ्या घातल्या होत्या. त्या दहशतवादी हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका स्थानिक नागरीकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा पूर्ण वचपा काढला जाईल, अशी स्पष्ट घोषणा केली होती. भारताने पूर्ण तयारीनिशी, हा हल्ला झाल्यानंतर 15 व्या दिवशी पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र आणि वायुहल्ले करुन 150 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या अभियानाला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे सार्थ नामोनिधान देण्यात आले होते. पाकिस्तानच्या वर्मावर आघात झाल्याने चवताळलेल्या त्या देशाने नंतर चार दिवस भारताच्या कुरापती काढण्याचे असंख्य प्रयत्न केले. तथापि, भारताच्या सजग, सावध आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेने ते आकाशातच उधळून लावले होते. त्यामुळे पाकिस्तानला फार मोठा सामरिक आणि मानसिक धक्का बसला.

पाकिस्तानची अतोनात हानी

एकीकडे पाकिस्तानचे हल्ल्याचे प्रयत्न उधळून लावतानाच भारताने पाकिस्तानचे वायुतळ, सेनातळ, दारुगोळ्याची गोदामे, चीनकडून घेतलेली रडार यंत्रणा आणि सीमावर्ती भागातील लष्करी चौक्या उद्धवस्त करुन आपल्या अभेद्य सामरिक सामर्थ्याचे दर्शन घडवत, पाकिस्तानला त्याची लायकी दाखवून दिली आहे.

भारताची भूमिका ठाम आणि स्पष्ट

शस्त्रसंधींसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्याधिकाऱ्यांनी शुक्रवारी आणि शनिवार असे दोन दिवस चर्चा केल्याचे दिसून येत आहे. भारताने या चर्चेतही आपली दहशतवादाविरोधातली भूमिका स्पष्टपणे मांडली अशी माहिती आहे. दहशतवाद हे युद्धच असून त्याविरोधात युद्धाप्रमाणेच कृती केली जाईल, हे भारताने निक्षून बजावले आहे. ही पाकिस्तानसाठी अखेरची संधी आहे, असेही भारताने ठणकावले असून भारताच्या सेनासामर्थ्यासमोर आवाक् झालेल्या पाकिस्तानने भारताच्या अटींवर शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शविल्याने ती शक्य झाली आहे, अशी महत्वाची माहिती सूत्रांनी शनिवारी रात्री दिली आहे.

संघर्षात भारताचे वर्चस्व

गेल्या बुधवारपासून सतत चार दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यात सशस्त्र संघर्ष घडत होता. या संघर्षात प्रारंभापासूनच भारताचे वर्चस्व राहिल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. भारताच्या क्षेपणास्त्रांनी आणि हॅमर बाँब्सनी पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचा विनासायास भेद करत पाकिस्तानच्या लष्करी तळांवर आणि सामरिक आस्थापनांवर विध्वंसक हल्ले केले. या हल्ल्यांनी पाकिस्तान अक्षरश: जेरीस आल्याचे दिसून आले. शनिवारी पाकिस्तानचे आठ वायुतळ भारताने लिलया उध्वस्त केले. पाकिस्तानला मात्र, भारताच्या सुरक्षा कवचाचा भेत करण्यात पूर्ण अपयश आल्याचे दिसून आले. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यांचा प्रयत्न अत्यंत विस्कळीत, शिस्तविहीन आणि निरुद्देश्य होता, असेही स्पष्ट झाले. भारताच्या सर्व सामरिक यंत्रणेला कणाइतकाही धक्का पोहचविण्यात पाकिस्तानला यश आले नाही. साऱ्या जगाने भारताच्या या सामर्थ्याची नोंद घेतली आहे.

कशी घडली शस्त्रसंधी...

ड भारताच्या आणि पाकिस्तानच्या सैन्याधिकाऱ्यांची एकमेकांशी थेट चर्चा शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस झाली. त्यानंतर शस्त्रसंधीची घोषणा

ड दहशतवादी कृत्य हे युद्धच असल्याची भारताची भूमिका. पुन्हा असे दु:साहस केल्यास याहीपेक्षा मोठा धडा पाकिस्तानला शिकविण्याचा निर्धार

ड अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची शनिवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्ताच्या विदेश मंत्र्यांसह चर्चा

ड दहशतवादावर तडजोड नसल्याची एस. जयशंकर यांची अमेरिकेकडेही स्पष्टोक्ती. आगळीक खपवून न घेण्याचा पाकिस्तानला स्पष्ट इशारा

भारताच्या अटींवर शस्त्रसंधी

ड भारताचा सिंधू पाणीवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय शस्त्रसंधीनंतरही लागू राहणार. पाकिस्तानचे पाणी आडविण्यासाठी प्रकल्प कार्यरत राहणारच

ड भारतावर पाकिस्ताने पुन्हा दहशतवादी हल्ला केल्यास भारत क्षमा करणार नाही. दु:साहस केल्यास पाकिस्तानचा अंत निश्चित करण्याचा निर्धार

ड आज रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट चर्चा होणार. या चर्चेवर शस्त्रसंधीचे भवितव्य अवलंबून असेल असे मत अनेक तज्ञांकडून व्यक्त

ड पाकिस्तानला 12 तासांचा अवधी. शस्त्रसंधीचा भंग करण्याचे दु:साहस केल्यास भारत ‘कंबरतोड’ प्रत्युत्तर देण्यास पूर्णत: सज्ज राहणार

ड शस्त्रसंधी काळात भारताचे भूदल, वायुदल आणि नौदल पूर्णत: युद्धसज्ज राहणार. शस्त्रसंधीचा भंग झाल्यास पाकिस्तानवर तुटून पडण्याची सज्जता.

उद्या दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा

भारत आणि पाकिस्तानदरम्यान संघर्षविरामाची घोषणा झाली आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून या संघर्षविरामाची सुरुवात झाली आहे. भारतीय विदेशमंत्री सचिव विक्रम मिसरी यांनी याची माहिती संक्षिप्त पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही देशांच्या डीजीएमओ चर्चेनंतर संघर्षविरामावर सहमती व्यक्त करण्यात आली. दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा सोमवार, 12 मे रोजी चर्चा करणार असल्याचे विदेश सचिव मिसरी यांनी सांगितले आहे. पाकिस्तानचे विदेशमंत्री इशाक डार यांनीही संघर्षविरामाची पुष्टी दिली. पाकिस्तान आणि भारताने तत्काळ प्रभावाने संघर्षविरामावर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने स्वत:च्या सार्वभौमत्वाशी तडजोड न करता क्षेत्रात शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केल्याचा दावा डार यांनी केला.

दोन्ही देशांदरम्यान संघर्षविराम झाल्याची माहिती विदेशमंत्री एस. जयशंकर यांनीही दिली. भारत आणि पाकिस्तानने शनिवारी गोळीबार आणि सैन्य कारवाई रोखण्यावर सहमती दर्शविली आहे. भारताने दहशतवादाच्या सर्व प्रकारांच्या विरोधात सातत्याने दृढ आणि ठाम भूमिका घेतली असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.

ट्रम्प यांच्याकडून पहिल्यांदा संकेत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम शनिवारी दोन्ही देशांदरम्यानच्या संघर्षविरामाची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान तत्काळ प्रभावाने संघर्षविरामासाठी तयार झाले आहेत असे ट्रम्प यांनी स्वत:चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथू सोशलवर नमूद केले. अमेरिकेच्या मध्यस्थीच्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तत्काळ संघर्षविरामावर सहमत झाले आहेत. दोन्ही देशांचे महान बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी अभिनंदन असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article