तिन्ही संरक्षण दलांचा पहिला अंतराळ अभ्यास
भविष्यातील युद्धक्षेत्राच्या स्थितींविषयी घेतली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी बुधवारी संरक्षण अंतराळ एजेन्सीकडून आयोजित पहिल्या अंतराळ अभ्यासात भाग घेतला. यादरम्यान तिन्ही संरक्षण दलांच्या अधिकाऱ्यांनी भविष्यातील युद्धक्षेत्राच्या स्थितींची माहिती जाणून घेतली आहे. 11 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय अभ्यास कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांना अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानांची ओळख करून देण्यात आली.
अंतराळ युद्धाच्या क्षेत्रात भारतीय सशस्त्र दलांची रणनीतिक तत्परता वाढविण्याच्या उद्देशाने हा अभ्यास महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. हे प्रशिक्षण अंतराळ आधारित मोहिमात्मक क्षमतांना मजबूत करणे, अंतराळ सुरक्षेसाठी तिन्ही दलांच्या एकीकरण वाढविण्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तीन दिवसीय अंतराळ अभ्यास कार्यक्रमाचा शुभारंभ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सोमवारी केला होता. यादरम्यान त्यांनी भारताच्या अंतराळ क्षमतांना वाढविण्यावर जोर दिला होता. भारताला स्वत:च्या अंतराळ क्षमतांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी नवनवे विचार आणि प्रक्रिया विकसित करण्यावर लक्ष द्यावे लागणार असल्याचे चौहान यांनी म्हटले होते.
अभ्यासादरम्यान अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ स्थिती जागरुकता आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमांबद्दल चर्चा झाली. यात महत्त्वपूर्ण संपत्तींची देखरेख आणि सुरक्षेसोबत वेगाने वाढत्या अंतराळ वातावरणात स्थिती जागरुकता कायम राखण्याच्या महत्त्वावरही चर्चा झाली आहे. अभ्यासात भाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना सैन्य, वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्रासोबत भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या विषय तज्ञांच्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.
तज्ञांनी सैन्य अंतराळ क्षमता आणि तंत्रज्ञानांचे वर्तमान आणि भविष्यातील परिदृश्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. यादरम्यान अंतराळ संचालनात येणारी आव्हाने आणि अंतराळ सुरक्षा, आंतरराष्ट्रीय अंतराळ कायद्यांविषयी सांगण्यात आले. अंतराळ अभ्यास 2024 मुळे तिन्ही संरक्षण दल आणि संरक्षण अंतराळ एजेन्सीदरम्यान आंतर-संचालन क्षमतेत सुधार, परस्पर सांमजस्याला चालना मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.