सुवर्ण रोख्यांचीपहिली मालिका 30 रोजी
128 टक्क्यांपेक्षा जादाचा परतावा मिळणार
वृत्तसंस्था/ मुंबई
सार्वभौम गोल्ड बाँडची पहिली मालिका 30 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. हे सुवर्ण रोखे 26 नोव्हेंबर 2015 रोजी 2,684 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने जारी करण्यात आले. सध्या आयबीजेएवर सोन्याची किंमत 6,161 रुपये प्रति ग्रॅम आहे. या किमतीनुसारच सुवर्णरोख्याची किमत मिळणार आहे. यादराने पाहता गुंतवणूकदारांना 128 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या मालिकेतील सुवर्ण रोखे योजनेत 9 लाख 13 हजार 571 युनिट विक्री झाले होते. सॉवरेन गोल्ड बाँडच्या या मालिकेतून बाहेर पडण्यासाठी खास किमत गृहित धरली जाणार आहे. विचार केल्यास इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) 24 कॅरेट सोन्याच्या बाजारातील किमतीनुसार ही किंमत ग्राह्या धरली जात आहे. 30 नोव्हेंबरला पहिली मालिका पूर्ण होत आहे. आयबीजेएवरनुसार, बुधवारी सोन्याचा भाव 366 रुपयांनी वाढून 61,616 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 4 मे रोजी सोन्याने 61,646 रुपयांची विक्रमी पातळी गाठली.
8 वर्षात 1.28 लाख कमावणार
जर एखाद्या गुंतवणूकदाराने नोव्हेंबर 2015 मध्ये गोल्ड बाँडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर 30 नोव्हेंबरला त्याला सुमारे 2.28 लाख रुपये मिळतील.