For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोपावर पहिले पोलंडचे चार्टर विमान दाखल

12:37 PM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोपावर पहिले पोलंडचे चार्टर विमान दाखल
Advertisement

विमानातून 184 पर्यटक गोव्यात दाखल : स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही विमान सेवा अत्यंत उपयुक्त

Advertisement

पेडणे : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल शुक्रवारी पोलंडमधून एंटर एअरच्या पहिल्या हंगामी चार्टर फ्लाइटचे स्वागत करण्यात आले. या विमानतून 184 पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. वॉर्सा आणि काटोविस येथून थेट उड्डाणे गोव्याला पोलंडशी जोडतात. गोव्याचे पर्यटन वाढणार असून  स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही विमान सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मोपा विमानतळाचे सीईओ शेषन यांनी सांगितले. दर सोमवार आणि शुक्रवारी नियोजित ही सेवा कार्यरत असेल. 184 प्रवाशांना घेऊन एंटर एअरच्या बोईंग 737 चे मोपावर आगमन झाले. पोलंडमधील पाहुण्यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय नियोजित आणि चार्टर उड्डाणांसाठी एक पसंतीचे विमानतळ म्हणून उदयास येत आहे. गेल्या काही महिन्यांत मॉस्को, येकातेरिनबर्ग, ताश्कंद, गॅटविक आणि मँचेस्टर सारख्या गंतव्यस्थानांसाठी मजबूत हवाई संपर्क स्थापित केला आहे आणि आधुनिक पायाभूत सुविधा, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अखंड प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुसज्ज आहे, असे शेषन यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.