For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारगीलमध्ये प्रथमच लढाऊ विमानाचे नाईट लँडिंग

06:50 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारगीलमध्ये प्रथमच लढाऊ विमानाचे नाईट लँडिंग
Advertisement

सी-130जे’ची सराव चाचणी यशस्वी : अंधाऱ्या रात्रीही शत्रूंवर राहणार नजर : हल्ला करण्यास सक्षम

Advertisement

वृत्तसंस्था/ कारगील

लडाख केंद्रशासित प्रदेशातील कारगीलमध्ये प्रथमच सी-130जे सुपर हक्मर्युलस विमानाचे नाईट लँडिंग यशस्वीपणे करण्यात आले. भारतीय वायुसेनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट करत रविवारी यासंबंधीची माहिती दिली. या यशस्वी चाचणीमुळे आता रात्रीच्या अंधारातही शत्रूंवर नजर ठेवली जाऊ शकते आणि त्यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतो.

Advertisement

कारगील शहरात सध्या कडाक्मयाची थंडी आहे. भारताच्या सुरक्षेसाठी हा परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळेच भारतीय वायुसेना आणि लष्कर या दोघांनीही येथे आपली उपस्थिती वाढवली आहे. त्यानंतर आता सुपर हक्मर्युलस विमान रात्री कारगील हवाई पट्टीवर उतरवत आणखी एका अव्वल कामगिरीची नोंद केली आहे. हवाई दलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आर्मी कमांडो दिसत आहेत. रात्रीच्या वेळी डोंगर आणि जंगलात शत्रूंवर लक्ष कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण कमांडोज घेत आहेत. तसेच ते टेरेन मास्किंग एक्सरसाईज करताना दिसत होते. हे एक विशेष प्रकारचे लष्करी ऑपरेशन असून ते शत्रूपासून बचाव करत आपले ध्येय गाठताना करावे लागते, असे हवाई दलाने या सरावासंदर्भात सांगितले

रात्रीचे लँडिंग आव्हानात्मक

लडाखमधील कारगीलची हवाई पट्टी समुद्रसपाटीपासून 8,800 फूट उंचीवर आहे. हा परिसर उंच टेकड्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. अशा परिस्थितीत येथे उतरणे अत्यंत अवघड मानले जाते. रात्रीच्या अंधारात उतरणे आणखी आव्हानात्मक आहे. लँडिंग दरम्यान विमानांना रात्रीच्या अंधारात केवळ पर्वत टाळावे लागतात असे नाही तर त्यासाठी त्यांना नेव्हिगेशनचा अवलंब करावा लागतो.

Advertisement
Tags :

.