For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

57व्या इफ्फीवर स्टीअरिंग कमिटीची पहिली बैठक

07:48 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
57व्या इफ्फीवर स्टीअरिंग कमिटीची पहिली बैठक
Advertisement

युवा प्रतिभेला व्यासपीठ देण्यावर भर

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पणजी : गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 57व्या इफ्फीच्या तयारीला वेग आला असून 57व्या इफ्फीचा आढावा घेण्यासाठी माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नवी दिल्लीतील कर्तव्य भवन 2 येथे पहिली स्टीअरिंग कमिटी बैठक घेण्यात आली. बैठकीत डॉ. मुऊगन यांनी युवा विद्यार्थी, नवोदित आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना अधिक संधी देण्याची तसेच  तऊण प्रतिभावंतांना आपली सर्जनशीलता सादर करण्यासाठी व्यासपीठ, अनुभवी चित्रपट निर्मात्यांकडून मार्गदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्राशी संवादाची संधी इफ्फीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. याशिवाय इफ्फीची पोहोच आणखी व्यापक करण्यासाठी जगभरातील दर्जेदार चित्रपट आणि आघाडीचे दिग्दर्शक, कलाकार व सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना भारतात आमंत्रित करण्यावर याचबरोबर मास्टरक्लास, अनुभवी चित्रपट निर्मात्यांशी संवाद आणि मार्गदर्शनाच्या संधी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

Advertisement

गोवा सरकारच्या इफ्फीच्या यशातील योगदानाचे कौतुक करताना डॉ. मुऊगन यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीचा गौरव केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी इफ्फीचा उपयोग भारताच्या वाढत्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि भारतीय व आंतरराष्ट्रीय सर्जनशील समुदायांमधील सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला. चित्रपट निर्माते, प्रतिनिधी, सिनेरसिक आणि पाहुण्यांना दर्जेदार व सुरळीत अनुभव मिळावा, यासाठी योग्य नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी 57व्या इफ्फीच्या तयारीसंदर्भातील विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. महोत्सव संचालक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी स्टीअरिंग कमिटीच्या सूचनांचे स्वागत करत युवा चित्रपट निर्मात्यांसाठी अधिक संधी, मास्टरक्लास तसेच भारत आणि परदेशातील उत्कृष्ट चित्रपटांची निवड यावर भर दिला.

गोवा सरकारच्या माहिती व प्रसिद्धी सचिवांनी महोत्सवाच्या तयारीची माहिती देत सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करून 57वा इफ्फी सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी दिली. इफ्फी हा केवळ चित्रपटांचा महोत्सव न राहता सर्जनशील देवाणघेवाण, सहकार्य आणि भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Advertisement
Tags :

.