'दालमिया' चा 3200 रुपये पहिला हप्ता
युनिट हेड संतोष कुंभार यांची माहिती
शेतकऱ्यांसाठी विविध योजना
कोल्हापूर
दालमिया भारत शुगर अँड लिमिटेड , शुगर युनिट निनाईदेवी करंगली आरळा यांच्या वतीने पत्रकार परिषदेत बोलताना युनिट हेड संतोष कुंभार यांनी हंगाम 2024- 25 साठी पहिली उचल रुपये 3200/- जाहीर केली असल्याचे सांगितले. हंगाम 2024-25 च्या आज अखेर एकूण 1,18,130 हजार मे टन इतके ऊस गाळप झाले असून साखरेचा उतारा 12.48 इतका मिळाला आहे.यावर्षी ऊस पुरवठा करण्राया शेतक्रयांना प्रति मे.टन रू 3200/ - पहिली उचल म्हणून देण्यात येणार आहे दिनांक 30 नोव्हेंबर 2024 अखेर गळीतास आलेल्या उसाच्या बिलाची रक्कम त्या त्या शेतक्रयाच्या बँक खात्यात आज वर्ग करण्यात आली आहे.
दालमिया भारतच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी बाबत राबविल्या जात असलेल्या उपक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले की सीएसआरमार्फत शेतक्रयांना कोंबडीची पिल्ले वाटप, तसेच गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, मुरघास, सायलेंज बॅग व गांडूळ खत बेड इत्यादीचे वाटप नेहमीच सुरू असते . तसेच दालमिया शुगरच्या शाश्वत ऊस शेती प्रकल्पांतर्गत ऊस वाढीसाठी सर्व शेतक्रयांना बांधावर जाऊन प्रत्यक्षमार्गदर्शन केले जाते व खताची व पाण्याची मात्रा याविषयी मार्गदर्शन केले जाते . त्यामुळे शेतक्रयांच्या उत्पन्न वाढीवर त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे, तसेच येथून पुढेही डालमिया ऊस दराबाबत उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवणार आहे . तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस डालमिया भारत शुगर कारखान्यास गळीतास पाठवावाअसे आवाहन युनिट हेड संतोष कुंभार यांनी केले ,या पत्रकार परिषदेस एच आर हेड महेश कवचाळे , रणधीर चव्हाण , राजेंद्र नाईक , सुधीर पाटील आदी हजर होते.