For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गात प्रथमच १४ रोजी डिजिटल मीडिया वर्कशॉप

03:08 PM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गात प्रथमच १४ रोजी डिजिटल मीडिया वर्कशॉप
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र यांच्या वतीने सिंधुदुर्गात प्रथमच डिजिटल मीडिया वर्कशॉपचे आयोजन रविवार १४ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर येथे सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत करण्यात आले आहे या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहेत सध्या डिजिटल मीडिया या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी असून त्याचा लाभ या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींना व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही एक दिवसीय कार्यशाळा असून त्यात गोवा येथील पत्रकार आणि ब्ल्यू बे स्टुडिओच्या रश्मी नरसे जोसलकर आणि पत्रकार, डिजिटल कंटेंट क्रियेटर गौरीश आमोणकर तसेच सिंधुदुर्गातील प्रसिद्ध अँकर जुईली पांगम मार्गदर्शन करणार आहेत. डिजिटल/ सोशल मीडिया प्रोफेशनल, ब्लॉगर्स, यु ट्युबर्स यांच्यासाठी ही कार्यशाळा म्हणजे सुवर्णसंधी आहे. या कार्यशाळेत सहभागासाठी राजेश मोंडकर ९४२३३०१७३१ आणि विद्या राणे सामंत ९४२३८५६५२८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.