For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आधी नतमस्तक झाला, मग मिठी मारली

06:19 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आधी नतमस्तक झाला  मग मिठी मारली
Advertisement

सिराजने केला बुमराहचा अनोखा सन्मान : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने आपल्या आरसीबीचा सात गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चौकार, षटकारांची आतषबाजी पहायला मिळाली. सामन्यादरम्यान, मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर आरसीबीचे फलंदाज हतबल दिसत होते. बुमराहने 21 धावा देऊन 5 बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावला. मात्र दुसरीकडे आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एकही विकेट घेता आली नाही. सामना संपल्यानंतर मोहम्मद सिराजची एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनीही याला मोठ्या प्रमाणात लाईक्स केले आहेत.

Advertisement

आरसीबीविरुद्ध बुमराहने अप्रतिम स्पेल टाकताना अवघ्या 21 धावांत 5 बळी घेण्याची किमया केली. बुमराहची गोलंदाजी पाहून मोहम्मद सिराजही त्याचा चाहता झाला. सामना संपल्यानंतर जेव्हा खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा सिराजने बुमराहला वाकून आदराने अभिवादन केले. सिराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये सिराज अभिवादन केल्यानंतर बुमराहची गळाभेट घेतल्याचं व्हिडिओत दिसत आहे. बुमराहने आपल्या शानदार कामगिरीने अनेक विक्रम रचले आहेत. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीविरुद्ध एका डावात 5 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.

एकाच डावात तिघांची अर्धशतके, तिघांचा भोपळा

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने जरी हा सामना जिंकला असला तरी आरसीबीने टी-20 क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम रचला आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस (61), रजत पाटीदार (50) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 53) यांनी शानदार अर्धशतकी खेळी साकारली. मात्र त्याच डावात ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर आणि विजयकुमार वैशाख खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. आयपीएलमध्ये असा अनोखा योगायोग पहिल्यांदाच पहायला मिळाला. एकाच संघातील तीन फलंदाजांनी अर्धशतके पूर्ण केले आणि तीन फलंदाज खातं न उघडताच बाद झाले.

आयपीएलमध्ये मॅक्सवेलचा फ्लॉप शो

यंदाच्या आयपीएलचा हंगाम आरसीबीसाठी आतापर्यंत चांगला राहिलेला नाही. विराट कोहली वगळता इतर खेळाडूकडून निराशाजनक खेळ पहायला मिळाला आहे. आरसीबीचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा आरसीबीसाठी सर्वात कमकुवत दुवा ठरू लागला आहे. मॅक्सवेल चालू हंगामात 3, 4 आणि 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, परंतु प्रत्येक वेळी त्याची बॅट शांतच राहिली. मॅक्सवेलने आतापर्यंत 6 डावांमध्ये केवळ 32 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 28 आहे, जी त्यानं केकेआरविरुद्ध केली होती. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यापैकी तीन सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. मुंबईविरुद्ध मॅक्सवेल आपल्या आयपीएल कारकिर्दीत 17 व्यांदा शून्यावर बाद झाला. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 0 धावांवर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे प्रथम स्थानी आला आहे. मॅक्सवेलशिवाय रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये 17 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

 शाब्बास डीके ! इस बार वर्ल्डकप खेलना है : रोहितचे रेकॉर्डिंग माईकमध्ये कैद

मुंबईविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकने 23 चेंडूत नाबाद 53 धावांची तुफानी खेळी साकारली. दिनेश कार्तिक मुंबई इंडियन्सविरुद्ध फलंदाजी करत असताना रोहित शर्मा त्याच्यासोबत मस्ती करत होता. रोहित दिनेश कार्तिकला म्हणत होता, शाब्बास डीके! त्याला टी-20 विश्वचषकात निवडीसाठी जोर लावायचा आहे. रोहितची ही कमेंट स्टंपच्या माईकमध्ये रेकॉर्ड झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रेक्षक म्हणाले, विराटला गोलंदाजी द्या, पण विराटने पकडले कान

मुंबईने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांची खराब अवस्था पाहून स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी चक्क विराट कोहलीलाच गोलंदाजी करण्याची मागणी केली. पण, सीमारेषेजवळ येत विराटने कान पकडत नम्रपणे आपण गोलंदाजी करणार नसल्याचे सांगितले. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

विराटची रोहितसोबत

आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सलामीची जोडी रोहित शर्मा व इशान किशन मैदानात आली. रोहितने स्ट्राईक घेतल्यानंतर एक धाव काढून नॉनस्ट्रायकर एंडला आल्यावर इशानकडे पाहत त्याला सूचना देत होता. त्यावेळी विराट कोहली त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या पायावर हात मारुन हाय रोहित, असे म्हणत क्षेत्ररक्षणसाठी पुढे जातो. आपल्याला कोणी स्पर्श केला हे बघण्यासाठी रोहितने मागे वळून पाहिले आणि कोहलीला पाहून त्याने थम्सअप करीत त्याला हसून प्रत्युत्तर दिले. हा व्हिडिओही बराच व्हायरल झाला आहे.

Advertisement
Tags :

.