महाकुंभ मेळाव्यात पहिले AI बेस्ड आयसीयु
एअर अॅम्ब्युलन्स तैनात, १०७ कोटींचा औषधांचा साठा
महाकुंभ मेळाव्यातील भाविकांवर होणार मोफत उपचार
प्रयागराज
प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्याला दिमाख्यात सुरुवात झालेली आहे. या कुंभ मेळाव्यात ४० कोटीहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मेळाव्यातील सर्व सहभागींना चांगल्या आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मेळाव्याच्या परिक्षेत्रात AI बेस्ड आयसीयु रुग्णालय बांधण्यात आलेले आहे.
महाकुंभात जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध असणारे केंद्रीय रुग्णालय सरकार तर्फे उभारण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी एअर अॅम्ब्युलन्स आणि रिव्हर अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. महाकुंभ मेळाव्यातील भाविकांची १०७ कोटींचा औषधाचा साठा उपलब्ध करण्यात आलेला आहे तर २७६ प्रकरच्या औषधांची यादीही तयार ठेवण्यात आलेली आहे. येथे महिला आणि मुलांसाठी विशेष वॉर्ड उभारण्यात आलेले आहे. या रुग्णालयात भाविकांवर मोफत उपचार होणार आहेत.
हे केंद्रीय रुग्णालय प्रयागराज येथील सुरु असलेल्या महाकुंभ मेळाव्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचे तयार करण्यात आलेले आहे. १०० बेड चे रुग्णालय असून येथे आपत्कालीन वॉर्ड, जनरल वॉर्ड अशा अनेक सुविधा उभारण्यातआ आलेल्या आहेत. याशिवाय कुंभ मेळावा क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीसाठी ३८० बेडची क्षमता असलेली ४३ रुग्णालये ही बांधण्यात आलेली आहेत. तसेच १४ एअर अॅम्ब्युलन्स आणि प्रत्येक घाटावर रिव्हर अॅम्ब्युलन्सची ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. महाकुंभ मेळाव्यात ४०० हुन अधिक डॉक्टर सेवेत रुजू करण्यात आलेले आहेत.