अफगाणिस्तान सीमेवर गोळीबार, 7 पाक सैनिक ठार
चालू वर्षात दोन्ही देशांच्या हल्यांत1100 नागरीक बळी
वृत्तसंस्था, काबूल
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर शनिवारी रात्री भीषण गोळीबार झाला आहे. या गोळीबारात पाकिस्तानचे 7 सैनिक मारले गेले आहेत. तर प्रत्युत्तरादाखलच्या हल्ल्यात अनेक तालिबानी सदस्य ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दोन्ही देशांदरम्यान हा संघर्ष वादग्रस्त डूरंड रेषेवर घडला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार चालू वर्षात अफगाणिस्तानात सीमेपलिकडून होणाऱ्या हिंसेत आतापर्यत 1100 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.
तालिबानकडून गोळीबारास प्रारंभ
अफगाण सीमा रक्षकांनी आमच्या तपासणी नाक्यांवर कुठल्याही चिथावणीशिवाय गोळीबार सुरू केल्याचा आरोप पाकिस्तानने केला. तर तालिबानने पाकिस्तानवर संघर्ष सुरू करण्याचा आणि विना अनुमती सीमा चौकी निर्माण करण्याचा आरोप केला आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या सैनिकांना नुकसान पोहोचल्याचे दावे केले आहेत.