महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराणी टोळीतील आरोपीवर गोळीबार

01:05 AM Nov 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गदग जिल्ह्यातील घटना : पोलिसांवर हल्ला करून पळ काढण्याचा प्रयत्न असफल

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

इराणी टोळीतील गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला आहे. गदग जिल्ह्यातील कुरवट्टी, ता. रोणजवळ शनिवारी दुपारी बेटगेरीचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी गोळीबार केला आहे. जखमी आरोपीला गदग जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

गोळीबारात बगारअली अहमदअली इराणी ऊर्फ बागी (वय 27) रा. शांतीनगर, भिवंडी-ठाणे हा जखमी झाला आहे. बगारअलीने केलेल्या हल्ल्यात अशोक गदग व हनुमंतप्पा ओलेकर हे दोन पोलीसही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गदगचे जिल्हा पोलीसप्रमुख बी. एस. नेमगौडा यांनी इस्पितळाला भेट देऊन जखमी पोलिसांची विचारपूस केली.

बगारअली व त्याच्या साथीदारांवर उत्तरप्रदेश पोलिसांनी पंधरा हजार रुपयांचे तर राजस्थान पोलिसांनी 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मुरादाबाद, सहारनपूरसह राजस्थानमधील जयपूर उत्तर पोलिसांनाही तो हवा होता. गंगावती पोलीस बगारअली व त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यासाठी काही दिवसांपूर्वी गदगला आले होते. अटक करून घेऊन जाताना मोटारसायकलवरून पाठलाग करून पोलिसांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता.

बेड्या हिसकावून काढला होता पळ

दि. 17 नोव्हेंबर रोजी बगारअलीला अटक करण्यात आली होती. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. होळेआलूरजवळ चेनस्नॅचिंग प्रकरणातील मोटारसायकल लपवून ठेवल्याची माहिती त्याने दिली होती. यासंबंधी पंचनामा करण्यासाठी पोलिसांचे एक पथक होळेआलूरला गेले होते. तेथून परतताना कुरवट्टीजवळ बेड्या हिसकावून घेऊन दोन पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी त्याच्यावर गोळीबार केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social_media
Next Article