For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेतोड्यात युवकावर गोळीबार

11:54 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेतोड्यात युवकावर गोळीबार
Advertisement

चालत्या स्कूटवऊन झाडली गोळी : पिस्तुलाची गोळी पाठीतून आरपार

Advertisement

फोंडा : बेतोडा-बोरी बगलरस्ता जंक्शनवर स्कूटरवऊन चाललेल्या सचिन सुभाष कुर्टीकर (32, रा. घोटमोड उसगाव) या युवकावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून बांबोळी येथील गोमेकॉत त्याच्यावर उपचार सुऊ आहेत. शुक्रवारी सकाळी 6 वा. सुमारास घडलेल्या या घटनेमुळे फोंडा परिसरात खळबळ माजली आहे. घटनेनंतर पसारा झालेल्या हल्लेखोरांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुऊ होता. सचिन हा बोरी येथील एका खासगी आस्थापनात ट्रकचालक आहे. नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी सकाळी लवकर घरातून तो बाहेर पडला. जीए 05 व्ही 6563 या क्रमांकाच्या स्कूटवऊन तो चालला होता. कुर्टी येथील बगलरस्त्यावऊन बोरीकडे जात असताना वाटेत बेतोडा जंक्शनजवळ त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्याच्या मागावर असलेले दोघे हल्लेखोर स्कूटरवऊन त्याचा पाठलाग करीत होते. बेतोडा जंक्शनवरील गतिरोधकाजवळ त्याच्या वाहनाची गती कमी होताच, दोघा हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्यावर जवळून पिस्तुलाची गोळी झाडली. ही गोळी त्याच्या पाठीच्या एका कुशीतून आरपार होत स्कूटरच्या मीटरवर आदळून तेथेच खाली पडली.

अचानकपणे झालेल्या या हल्ल्यातून त्याने स्वत:ला कसेबसे सावरले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला पाहून रस्त्यावऊन जाणारे काही वाहनचालक त्याच्या मदतीला धावले. बेतोड्यातील एका माजी पंचसदस्याने जखमी सचिनला आपल्या खासगी वाहनातून तातडीने फोंड्यातील उपजिल्हा इस्पितळात नेले. पण प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यात आले. सचिनवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक सुनिता सावंत, उपअधीक्षक अर्सी अदील, निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावर 7.6 एमएमची गोळी तसेच स्कूटरवर रक्त सांडले हेते. हल्लेखोराने देशी बनावटीचे पिस्तुल वापरले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तसेच ज्या पद्धतीने हा हल्ला करण्यात आला, त्यामागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

सचिनच्या जबानीवऊन पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुऊ केला आहे. अनैतिक संबंधातून हा प्राणघातक हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यादृष्टीनेही तपास सुऊ आहे. या प्रकरणी खूनाचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत तपासकार्य सुऊ होते. दरम्यान या गोळीबार प्रकरणी काँग्रेस तसेच गोवा फॉरवर्डने राज्यातील वाढते गुन्हे व कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी या घटनेची संभावना गॅग्स ऑफ वसेहपूर अशी केली आहे. काँग्रेस नेते अॅड. ह्य्दयनाथ शिरोडकर यांनी राज्यातील ढासलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल सरकारवर टीका केली आहे. ज्या बेतोडा बगलरस्त्यावर हा गोळीबार झाला, त्या परिसरात बेतोडा पंचायतीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तपासाच्यादृष्टीने पोलिसांना या कॅमेरांची फुटेज महत्त्वाची ठरणार होती. पण ते नादुऊस्त असल्याने काही स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.