For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलग दुसऱ्या दिवशी मणिपूरमध्ये गोळीबार

06:39 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
सलग दुसऱ्या दिवशी मणिपूरमध्ये गोळीबार
Advertisement

कांगपोकपीमधील संघर्षात एकाचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमध्ये शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे दिसत आहे. गेले सलग दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्या असून त्याला जातीय संघर्षाची धार असल्याचे दिसून येत आहे. कांगपोकपी जिल्ह्यातील कांगचूप हिल रेंजमध्ये शनिवारी रात्री दोन गटांमध्ये सुरू झालेला गोळीबार रविवारी सकाळीही सुरूच होता. यामध्ये गावातील एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामुळे आदिवासी समाजाच्या एका संघटनेने 12 तास बंदची घोषणा केली आहे. या काळात कांगपोकपी येथील सदर हिल्समधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

Advertisement

कांगपोकपी येथे एका गटातील 12 जणांनी एकाचवेळी डोंगराळ भागातून गावावर गोळीबार केला. त्यांनी मोर्टारही डागले. प्रत्युत्तरात गावकऱ्यांनीही प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. कोर्टुक गावात गोळीबार झाल्यानंतर आजूबाजूच्या गावातही गोळीबार झाला. काही घरांमध्ये गोळीबाराच्या खुणा सापडल्या आहेत. या हल्ल्यामुळे सदर भागातील महिला आणि मुलांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. पोलीस फौजफाटाही वाढवण्यात असला तरी या भागातील लोक दहशतीखाली वावरत आहेत.

लामांग किपगेन असे गोळीबारात ठार झालेल्या स्वयंसेवकाचे नाव आहे. तो कांगपोकपी येथील मालसोंग गावचा रहिवासी आहे. शनिवारी रात्री उशिरा त्याच्यावर गोळीबार झाल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. रविवारी सकाळी ऊग्णालयात उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी 26 एप्रिलच्या रात्री इम्फाळ पूर्व सीमेवरील सिनम कोम गावात दोन गटांमध्ये गोळीबार झाला होता. यामध्येही एका 33 वषीय ग्रामस्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता. याचदरम्यान शनिवारी कुकी दहशतवाद्यांनी सेंट्रल फोर्सच्या चौकीवर बॉम्ब फेकल्यामुळे दोन जवान हुतात्मा झाले होते.

Advertisement
Tags :

.