महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वैयक्तिक वैमनस्यातून दिल्लीत गोळीबार

06:13 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

60 हून अधिक राऊंड गोळीबार, बाल्कनीत उभी असलेली मुलगी जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राजधानी दिल्ली शनिवारी रात्री अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने हादरली. ईशान्य दिल्लीतील वेलकम परिसरात दोन गटांमध्ये वैयक्तिक वैमनस्यातून हाणामारी झाल्यानंतर जोरदार गोळीबार झाला. वेलकम परिसरातील झेड ब्लॉकमध्ये ही घटना घडली असून अंदाधुंद गोळीबारामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. जीन्सच्या घाऊक विव्रेत्यांमध्ये पैशांच्या देव-घेव व्यवहारावरून भांडण सुरू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या गोळीबारात सहभागी असलेल्या काही आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सुमारे 60 गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारादरम्यान घराच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या 22 वषीय तऊणीच्या छातीत गोळी लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबाराची ही घटना परस्पर वैमनस्यातून घडली आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.

ईशान्य दिल्लीचे डीसीपीही रात्री घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी रस्त्यावर रिकामी काडतुसे आढळल्याची बाब मान्य केली. तसेच या गोळीबारात इफ्रा नावाची मुलगी जखमी झाली असून तिला जीटीव्ही ऊग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे पथक घटनास्थळी हजर झाल्यानंतर घटनास्थळावरून रिकामे काडतूस, जिवंत काडतूस आणि धातूचे तुकडे असे एकूण 17 मुद्देमाल सापडले असून ते तपासासाठी जमा करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article