For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंदीगड न्यायालयात गोळीबार

06:39 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
चंदीगड न्यायालयात गोळीबार
Advertisement

पंजाबच्या माजी ‘एआयजी’ने जावयाची केली हत्या : संबंधिताला अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

चंदीगड न्यायालय संकुलामध्ये शनिवारी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या वादातून दोन पक्ष कौटुंबिक न्यायालयात आल्यानंतर ही घटना घडली असून गोळीबारात एकजण ठार झाला आहे. पंजाब पोलीस दलातील माजी एआयजी मलविंदर सिंग सिद्धू यांनी आपल्या जावयावर गोळीबार केला. मृत जावई हरप्रीत सिंग कृषी विभागात आयआरएस होते.

Advertisement

आपल्या जावयाची हत्या करण्यासाठी आरोपी मलविंदर सिंग सिद्धू यांनी आपल्या बंदुकीतून पाच गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या जावयाला लागल्या. एक गोळी आतल्या खोलीच्या दरवाजाला लागली. गोळीबाराच्या आवाजाने न्यायालय आवारात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी पोहोचलेल्या वकिलांनी आरोपीला पकडून एका खोलीत बंद करत पोलिसांना माहिती दिली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या आयआरएस अधिकारी हरप्रीत सिंग यांना सेक्टर 16 ऊग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोलीत बंद असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. दोन्ही कुटुंबीय मध्यस्थी सत्रासाठी जिल्हा न्यायालयात पोहोचले होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

न्यायालयात घडलेल्या प्रकारानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. हरप्रीत आपल्या पत्नीसोबत वैवाहिक वादात अडकला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तो जिल्हा न्यायालयात पोहोचला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील लवादाची ही तिसरी सुनावणी होती. सुमारे दीड महिन्यांपूर्वी दोन्ही पक्षकारांमध्ये तोडगा काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धीरज ठाकूर या वकिलाची नियुक्ती करण्यात आली होती.

आरोपीची पार्श्वभूमी यापूर्वीही वादात

निवृत्त एआयजी सिद्धू यापूर्वीही वादात सापडले आहेत. गेल्यावषी त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. अटकेदरम्यान त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली होती. त्यानंतरही त्यांनी आपल्या जावयावर आरोप केले होते.  गेल्यावषी नोव्हेंबरमध्ये पंजाब पोलिसांच्या मानवाधिकार सेलचे तत्कालीन सहाय्यक महानिरीक्षक मलविंदर सिंग सिद्धू यांच्याविऊद्ध पंजाब दक्षता ब्युरोने आपल्या पदाचा गैरवापर, फसवणूक, ब्लॅकमेल, खंडणी आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Advertisement
Tags :

.