For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कावेरी अभयारण्यात गोळीबार; तिघांचा मृत्यू

06:26 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
कावेरी अभयारण्यात गोळीबार  तिघांचा मृत्यू
Advertisement

चामराजनगर जिल्ह्यातील घटना : बेकायदा शिकार करत असल्याची माहिती

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर

Advertisement

चामराजनगर जिल्ह्याच्या हनूर तालुक्मयातील कावेरी वन्यजीव अभयारण्याच्या होळेदट्टी वनक्षेत्रात शनिवारी पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. मृतांमध्ये हनूर तालुक्मयातील तोमियर पाळ्या गावातील अँथोनीस्वामी, पीटर आणि कुमार यांचा समावेश आहे. महिमदास हा जखमी झाला असून त्याला ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हनूर वनक्षेत्रातील शाग्य बीट परिसरात काही जण वन्यप्राण्यांची बेकायदा शिकार करून मांस वेगळे करत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी वनकर्मचारी आणि कथित शिकाऱ्यांमध्ये गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत तिघांना गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला.

वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी शाग्य डीआरएफओ कार्यालयात घुसून फर्निचरची तोडफोड केली. मृत झालेले तिघे बेकायदा शिकारी नव्हते. तसेच त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला नव्हता, असा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. ‘प्रत्युत्तरादाखल गोळीबार’ केल्याचे सांगून त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तोपर्यंत कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही : वनमंत्री रामलिंगारेड्डी

कावेरी वन्यजीव अभयारण्यातील शाग्य वनक्षेत्रात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेले तिघे जण वनक्षेत्रात बेकायदा प्रवेश करून शिकारीसाठी आले होते. तसेच मृत व्यक्तींकडून चार बॅगमध्ये भरलेले हरणाचे मांस जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती वनमंत्री रामलिंगारे•ाr यांनी दिली.  या घटनेची सखोल चौकशी सुरू असून चौकशीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोळीबारप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री शिवकुमार

कावेरी वन्यजीव विभागातील जंगलात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी होत असून, कशा स्वरुपाची आणि किती भरपाई द्यायची, याचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. गोळीबार झालेल्या घटनास्थळी बंदुका आढळून आल्या आहेत. मृत व्यक्ती शिकारीसाठी जंगलात गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जाणार असून, न्यायालयीन चौकशीतून नेमके सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर

कावेरी वन्यजीव अभयारण्याच्या शाग्य वनक्षेत्रात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या घटनेप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात हनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तोमियार पाळ्या येथील मृत अँथोनीस्वामी यांच्या पत्नी लूर्दामेरी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. रात्रीच्या वेळी जंगलातील एका ठिकाणी झोपलेल्या व्यक्तींवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली, असे तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.